Mahashivratri 2024
Mahashivratri 2024 esakal
लाइफस्टाइल

Mahashivratri 2024 : महाराष्ट्रातल्या या मंदिराची एका रात्रीत दिशा बदलली, पण का?

सकाळ डिजिटल टीम

Mahashivratri 2024 :

आपल्या देशात १२ ज्योतिर्लिंग आहेत. ज्यांच्या दर्शनाने साक्षात देवाधीदेव महादेवांचा साक्षात्कार घडतो. महाराष्ट्रातील भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा येथील नागनाथ आणि परळी वैजनाथ ही पाच ज्योतिर्लिंगे आहेत. यापैकी एका महादेवांच्या मंदिरात चमत्कार घडला होता. देव भक्तीचा भुकेला असतो.

महादेवांच्या या मंदिराचे नाव आहे औढा नागनाथ मंदिर. हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्याचे पौराणिक अन् ऐतिहासिक महत्त्व ही अफाट आहे. हिंगोली जिल्ह्यात औढा नागनाथ मंदिर आहे. नांदेडपासून ६० कि.मी अंतरावर हे मंदिर आहे. हे मंदिर पाच हजार वर्ष जून आहे.

या मंदिराची पौराणिक कथा अशी सांगितली जाते की, तारूका नावाचा राक्षस होता त्याने दृढ तपश्चर्या केली. देवांकडून वरदान मागून घेतलं अन् त्याचा गो दुरोपयोग करू लागला. देव, साधू मुनी यांना त्रास देऊ लागला. तेव्हा या राक्षसाचा वध करण्यासाठी देवांनी महादेवांचे अवाहन केले. महादेवांकडे याचना केली. तेव्हा महादेवांनी या राक्षसाचा वध केला. जिथे या राक्षसाचा वध झाला ते हे औढा नागनाथ मंदिर होय.

मंदिराचे बांधकाम कोणी केले

साधारण पाच हजार वर्ष जून मंदिर आहे. त्याचे बांधकाम कोणी केले असा प्रश्न पडला असेल. तर त्याचे उत्तर आहे, हे मंदिर पाच पांडवांनी बांधले आहे. हस्तिनापूरातून जेव्हा पांडव बाहेर पडले तेव्हा ते एका गावात एकच दिवस रहायचे. आणि त्या गावात त्यांनी मंदिरे बांधली.

त्याच काळात औढा नागनाथांचे हे मंदिर पांडवांपैकी सर्वात मोठे असलेले युधिष्ठीर यांनी बांधले. या मंदिराचे बांधकाम अतिशय कोरीव अन् रेखीव आहे. या मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत. विशेष गोष्ट म्हणजे मंदिरातील गाभारा जमिनीत आहे. म्हणजेच दर्शनासाठी जाताना आपल्याला दोन पायऱ्या खाली उतरून मग दर्शनासाठी जावे लागते.

११ व्या शकतातील जूने बांधकाम असलेले हे मंदिर मुघलांच्या आक्रमनात पाडण्यात आले होते. तेव्हा पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला.

असा वेगळा इतिहास असलेले हे मंदिराचे वैशिष्ट म्हणजे या मंदिराच्या मागील बाजूस नंदी महाराज आहेत. त्याचे कारण असे की, भगवान शंकरांनी एका भक्तासाठी मंदिराचे प्रवेशद्वारच उलट्या दिशेला फिरवले. ती कथा काय आहे हे पाहुयात.

मंदिराची दिशा कोणासाठी बदलली

नाथ सांप्रदायात अनेक संत होऊन गेले. त्यांनी लिहिलेल्या ओव्या, गाथा, ग्रंथ आपल्याला जीवनाचे सार सांगतात. भक्तीमार्गात आलेल्या भक्ताला आधी संतांपर्यंत पोहोचावे लागते अन् नंतर देवापर्यंत. म्हणजेच देव अन् मनुष्याला जोडणारा सुंदर, अमृताहूनी गोड दुवा म्हणजेच संत आहेत.

संत नामदेवांचे किर्तन औंढा नागनाथ मंदिरात सुरू होतं. पण त्याकाळात अस्पृश्यता जगणारे काही समाटकंटक जिवंत होते. अन् त्या लोकांना संत नामदेवांचे मंदिरात किर्तन करणे खटकले. तेव्हा त्या उच्चभ्रू लोकांनी संत नामदेवांना मंदिरात किर्तन करू नका असे सुनावले. तसेच, मंदिरात जाण्यापासूनही रोखले.

एखाद्या ठिकाणी असलेल्या मंदिरा इतकाच त्याचा आजूबाजूचा परिसरही पवित्र असतो. तिथेही देवाचा वास असतो. तेव्हा नामदेव महाराजांनी मंदिराच्या गाभाऱ्याच्या पाठीमागे किर्तन करण्यास सुरूवात केली. पण जेव्हा संत नामदेवांनी मंदिरात किर्तन करण्यास बंद केले. तेव्हा एक चमत्कार घडला.

मंदिराच्या पाठीमागे उभे राहून देवांचा धावा करणारे, रसाळ वाणीत देवांची स्तूती करणाऱ्या संत नामदेवांपासून साक्षात महादेवांनाही दुरावा सहन होईना. तेव्हा महादेवांनी मंदिराची दिशाच बदलली. आधी पूर्वेकडे असलेले मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिम दिशेला फिरवले. आणि संत नामदेवांचे किर्तन करण्याची वाट मोकळी करून दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT