Mahashivratri 2024 : शिकाऱ्याकडून नकळत झाला शिवलिंगावर अभिषेक, महाशिवरात्रीची पौराणिक कथा काय आहे?

महाशिवरात्रीच्या दिवशी शिकारी शिकार करण्यासाठी जंगलात गेला अन् ...
Mahashivratri 2024
Mahashivratri 2024 esakal

Mahashivratri 2024 :

आज सर्वत्र महाशिवारत्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. भगवान शंकरांचे भक्त महाशिवारत्रीची आतुरतेने वाट पाहत असतात. महाशिवरात्रीला संपूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडला जातो. तर भारतातील काही भागात या दिवशी थंडाई नैवेद्याला दिली जाते.

महाशिवरात्रीला पौराणिक महत्त्व आहे. महाशिवरात्री दिवशी सकाळपासूनच महादेवांच्या मंदिरात भक्तांची गर्दी होते. त्यानिमित्तानेच आज आपण महाशिवरात्रीची एक पौराणिक कथा पाहणार आहोत. जी महादेवांच्या अनेक भक्तांना माहिती नसेल.

Mahashivratri 2024
Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचे दर्शन घ्यायचे आहे? मग, महाराष्ट्रातील 'या' मंदिरांना नक्की द्या भेट

एकदा जंगलात एक शिकारी शिकार करण्यासाठी गेला. जंगलात मिळेल त्या प्राण्याची शिकार करायची आणि त विकून उदरनिर्वाह करायचा असा त्याचा नित्यक्रम होता. एका रात्री त्याच्या बाबतीत भलतच काहीतरी घडलं.

ती रात्र होती महाशिवरात्रीची. तो शिकारी देवांना मानत नव्हता. त्यामुळे त्याने त्या दिवशीही शिकार करण्याचे ठरवले. तो शिकारी मोक्याचे ठिकाण पाहून जंगलात एका झाडावर जाऊन बसला. ते झाड होते बेलाचे.

त्या झाडावर त्याने सोबतच एक पाण्याचे कमंडलूही आणले होते. ज्यामुळे त्याला तहान भागवता येईल. आता तो शिकारी झाडावर बसून शिकार मिळण्याची वाट पाहू लागला. थोड्याच वेळात त्याला एका हरीणीची चाहुल लागली.

तिथे एक डौलदार शरीर असलेलं हरीण उभं होतं. तो शिकारी धनुष्याला हात घालून बाण लावणार तोच त्याचा धक्का पाण्याच्या भांड्याला लागला अन् त्यामुळे पाणी आणि बेलाची तीन पाने झाडाखाली असलेल्या महादेवांच्या पिंडीवर पडली. रात्रीचा हा पहिला प्रहर होता.

Mahashivratri 2024
Mahashivratri Rangoli Designs 2024 : महाशिवरात्रीला करा शंकर-पार्वतीचे स्वागत, अंगणात काढा ‘या’ सोप्या आणि आकर्षक रांगोळ्या

पाण्याचा आवाज आल्यानं हरीणी सावध झाली. आणि त्या शिकाऱ्याकडे दयायाचना करू लागली. कृपा करून मला मारू नको, मला थोडा वेळ द्या मी घरी जाऊन माझी लहान बाळ माझ्या बहिणीकडे सोपवून परत येते. तेव्हा शिकाऱ्याने हरीणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तिला जाऊ दिले.

थोड्यावेळात तिथे त्याच हरिणाची बहिण आली. ती दिसल्यावरही शिकाऱ्याने धनुष्याला हात घालून बाण लावणार तोच त्याचा धक्का पाण्याच्या भांड्याला लागला अन् त्यामुळे पाणी आणि बेलाची तीन पाने झाडाखाली असलेल्या महादेवांच्या पिंडीवर पडली. रात्रीचा हा पहिला दुसऱ्या प्रहरीही हेच घडलं.

त्याच्या आवाजाने सावध झालेल्या हरीणीने शिकाऱ्याकडे तशीच मागणी करत दया मागितली. शिकाऱ्यानेही तिला जाऊ दिले.

Mahashivratri 2024
Mahashivratri 2023 : जगातील सर्वात मोठे नैसर्गिक शिवलिंग भारतात; येथे आपोआप वाढतो शिवलिंगाचा आकार

थोड्यावेळाने तिथे एक नर हरीण आले. ते पाणी पित असताना शिकारी धनुष्याला हात घालून बाण लावणार तोच त्याचा धक्का पाण्याच्या भांड्याला लागला अन् त्यामुळे पाणी आणि बेलाची तीन पाने झाडाखाली असलेल्या महादेवांच्या पिंडीवर पडली. रात्रीचा हा पहिला तिसरा प्रहर होता.

त्याच्या आवाजाने सावध झालेल्या हरीणीने शिकाऱ्याकडे तशीच मागणी करत दया मागितली. शिकाऱ्यानेही त्यालाही परत येण्याच्या अटीवर जाऊ दिले. आता ते हरीण जंगलात कळपात परत आले. आणि आपल्या राणीकडे म्हणजेच मघाच्या त्या पहिल्या हरीणीला बाळाची काळजी घेण्यास सांगून निघू लागले.

Mahashivratri 2024
Mahashivratri 2023 : त्र्यंबकेश्वरला पहाटेपासून दर्शनासाठी रांगा; गंगापूजनासह विविध कार्यक्रम

तेव्हा त्या दोन हरीणी आणि नर हरीण हे तिघेही शिकाऱ्याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी पुन्हा त्याच्याकडे येऊ लागल्या. तेव्हा त्यांची पिल्लेही त्यांच्यासोबत आली. आता जेव्हा पुन्हा शिकारी त्या हरणांना मारण्यासाठी धनुष्याचा बाण खेचतो तेव्हा तिथल्या कलशातील पाणी सांडते अन् महादेवांच्या शिवलिंगावर बेलाची पाने व पाण्याचा अभिषेक होतो.

आता जेव्हा हरणांचे संपूर्ण कुटुंबच त्या शिकाऱ्याला मला मारून टाक, आम्ही आलोय असे सांगते. तेव्हा तो शिकारीही अवाक् होतो. तसेच त्याच्याकडून नकरळ झालेल्या अभिषेकामुळे त्याचे मन परिवर्तनही झाले. तो शिकारीही हरणाच्या कुटुंबाला तो सोडून देतो. तुम्ही तुमच्या घरी जा, मी तुम्हाला मारू शकणार नाही, असे सांगतो.

शिकाऱ्याने महाशिवरात्रीच्या दिवशी केलेल्या अभिषेकाची फलप्राप्ती म्हणून साक्षात भगवान शंकारांनी शिकाऱ्याला दर्शन दिले. आणि धनसंपत्ती,सुख समृद्धीची भरभराट होईल असे सांगितले.

Mahashivratri 2024
Mahashivratri 2023 : राजगिऱ्याचे लाडू अन् भगर तर खाल्ली असेलच; उपवासाचा कढी-भात कधी ट्राय केलाय का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com