लाइफस्टाइल

Bhogi 2024 : भोगी म्हणजे नेमकं काय? घराघरांमध्ये कशी केली जाते साजरी?

भोगी म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या

Aishwarya Musale

सूर्याचं मकर राशीत प्रवेश करणं या दिवसाला मकर संक्रांत म्हणून आपण ओळखतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. संपूर्ण भारतभर भोगी हा सण साजरा केला जातो. फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावानं संबोधलं जाते.

तामिळनाडूत हा सण 'भोंगीपोंगल’ म्हणून साजरा करतात. तर आसाममध्ये ‘भोगली बहू’ म्हणून साजरा करतात. तर पंजाबमध्ये ‘लोहरी’, राजस्थानमध्ये ‘उत्तरावन’ म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी जुन्या-वाईट गोष्टींचा त्याग केला जातो. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते. भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणारा असा होतो. या दिवशी गावात दारासमोर रांगोळी काढली जाते.

तसेच घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. तसेच या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची देखील पद्धत आहे.

भोगीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी भोगीची भाजी घरा-घरात शिजवली जाते. विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. भोगीच्या दिवसात गुलाबी थंडी सुरू झालेली असते. अशा वातावरणात गरम गोष्टी, भाज्या खाणं शरीरास फायदेशीर असते. 

भोगी हा सण तितकाच खास असल्यामुळे त्याचे महत्वही तितकंच खास आहे. वटाण्याच्या शेंगा म्हणजेच मटार, गाजर, वांगी, घेवडा, वालाच्या शेंगा, हरबरा, तीळ आदी या सर्व भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट घालून भोगीची भाजी तयार करतात. तीळ लावून बाजरीची भाकरी करतात. भाकरीसोबत खायला वांग्याचं भरीत केलं जातं. 

आज शिख साजरी करणार लोहरी

लोहरी हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्याच्या शेवटच्या रात्री साजरा केला जातो. शिखांसाठी लोहरीला विशेष महत्त्व आहे. हा एक लोकप्रिय कापणीचा सण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Raises Milk Prices: महागाईचा आणखी एक फटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवीन दर कधीपासून लागू होतील?

Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

१०,०००+ धावा, ३५०+ विकेट्स... स्टार खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; भारतात पदार्पणातील सामन्यात चमकलेला...

NEET paper leak: पुण्यात ब्युटी पार्लरवाली मनिषा अन् राहुरीचा एजंट धनंजय नेट पेपरफुटीचे खरे मास्टरमाईंडच, काय घडलं?

Mumbai University Renaming: मुंबई विद्यापीठाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नाव देण्याची मागणी; साहित्य परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT