Makeup Products Buying Tips:  Sakal
लाइफस्टाइल

Makeup Products Buying : पहिल्यांदाच मेकअपचे सामान खरेदी करत असाल तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात, मिळतील अनेक फायदे

Makeup Products Buying Tips: जर तुम्ही पहिल्यांदाच मेकअपचे साहित्य खरेदी करायाला जात असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण यामुळे तुमच्या चेहऱ्याला अनेक फायदे मिळू शकतात आणि मेकअप देखील परफेक्ट होईल.

Puja Bonkile

Makeup Products Buying Tips: अनेक महिला चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी तसेच त्वचेवरील काले डाग लपवण्यासाठी मेकअपचा वापर करतात. मेकअप केल्याने अनेकांचा आत्मविश्वास वाढतो. मेकअप करणे ही एक प्रकारची कला आहे. ज्यामुळे लोकांना त्यांचे व्यक्तीमत्व वाढवण्याची संधी मिळते. एक काळ असा होता जेव्हा महिला फक्त लग्न, पार्टी, इतर कोणताही कार्यक्रम असला तरच मेकअप करत होत्या. पण आजच्या बदलत्या काळात अनेक महिला लोक मेकअप करतात. मेकअपमुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. पण त्याचा योग्य वापर करणे देखील गरजेचे आहे. तुम्ही योग्य मेकअपचे साहित्य न वापरल्यास चेहरा खराब दिसू शकतो. यामुळे तुम्ही पहिल्यादांच मेकअपचे साहित्य खरेदी करत असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

त्वचेचा प्रकार

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तेलमुक्त आणि मॅट फिनिश असलेले प्रोडक्ट खेरी करावे. कोरड्या त्वचेसाठी हायड्रेटिंग आणि क्रीमी प्रोडक्ट वापरावे. तसेच जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर सुगंध मुक्त हायपोअलर्जेनिक प्रोडक्ट खेरदी करावे. यामुळे तुमचा मेकअप परफेक्ट होईल आणि लूक सुंदर दिसेल.

योग्य शॅडो

मेकअपसाठी शॅडो खरेदी करताना त्वचेच्या प्रकारानुसार शॅडो निवडावा. लिपस्टिकचे न्युड, गुलाबी, यासारखे रंग सर्व प्रकारच्या त्वचेला चांगले दिसतात. तरीसुद्धा खरेदी करण्यापूर्वी ते त्वचेवर लावून तपासावे.

ब्रँड

मेकअप प्रोडक्ट खरेदी करताना चांगल्या ब्रँडचे खरेदी करावे. यामुळे त्वचेला कोणतेही नुकसान होणार नाही. स्वस्त आणि हलक्या दर्जाचे मेकअप प्रोडक्ट वापरल्यास त्वचा खराब होऊ शकते. मेकअपचे प्रोडक्ट शक्य असल्यास दुकानात जाऊनच खरेदी करावे.

Makeup Tips

मेकअप साहित्यावरचे घटक

मेकअपचे प्रोडक्ट खरेदी करताना त्यावरचे घटक तपासावे. त्यात काही हानिकारक घटक नाही ना याची खात्री करावी. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर या गोष्टी कडे जास्त लक्ष द्यावे.

सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला

तुम्ही पहिल्यादांच मेकअप प्रोडक्ट खरेदी करत असाल मेकअप आर्टिस्ट किंवा सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. यामुळे तुमच्या त्वचेला कोणतेही नुकसान होणार नाही. तसेच योग्य मेकअप प्रोडक्टमुळे तुम्हाला परफेक्ट लूक मिळेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT