Mangal Dosh Upay esakal
लाइफस्टाइल

Mangal Dosh Upay: कुंडलीत आलेला मंगळ राशीला त्रासदायक ठरतो; अशी मिळवा मंगळ दोषापासून सुटका

हनुमानाची नित्य पूजा केल्यास मंगळ दोष दूर होतो

Pooja Karande-Kadam

Mangal Dosh Upay: जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळाची स्थिती मजबूत असते तेव्हा अनेक फायदे होतात. मंगळ बलवान असेल तर व्यक्तीला करिअरच्या क्षेत्रात शुभ परिणाम मिळतात. मंगळाचा स्वभाव उग्र मानला जातो. परंतु जेव्हा मंगळ आनंदी आणि बलवान असतो तेव्हा तो त्याच्या राशींवर आशीर्वाद देतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाची शक्ती ही धैर्य आणि शौर्याचा कारक मानली जाते. कुंडलीत मंगळ कमजोर असेल तर व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दुसरीकडे काही सोपे उपाय करून तुम्ही मंगळाच्या अशुभ छायेपासून सुटका मिळवू शकता. (Mangal Dosh)

ज्योतिषांच्या मते, मुलाच्या कुंडलीतील मंगल दोष काही साध्या उपायांनी दूर केला जातो. कधीकधी मुलाच्या वयाच्या २८ वर्षानंतरही मंगळ दोष असाच दूर होतो. याउलट हा दोष मुलीच्या कुंडलीत असल्यास त्याचा प्रभाव दीर्घकाळ दिसून येतो.

अशा परिस्थितीत जर एखाद्या मुलीचे लग्न झाले तर तिचे वैवाहिक जीवनात अडचणी येतात, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. मंगळ ग्रह स्वभावाने तामसी आणि उग्र आहे. हा ज्या स्थानावर बसतो त्याचा नाश करतो आणि ज्या स्थानाकडे बघतो त्यालासुद्धा प्रभावित करतो.(These mantras can easily get rid of Mangal Dosh)

मंगळ फक्त मेष किंवा वृश्चिक राशीत (स्वग्रही) असेल तर नुकसान करत नाही. पत्रिकेत मंगळ प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम किंवा द्वादश स्थानात असेल तर ती पत्रिका मंगळी असते.

मंगळ दोषासाठी तांत्रोक्त मंत्र

ॐ हां हंस: खं ख:"

"ॐ हूं श्रीं मंगलाय नम:"

"ॐ क्रां क्रीं क्रौं स: भौमाय नम:"

मंगळ नावाचा मंत्र

"ॐ अं अंगारकाय नम:"

"ॐ भौं भौमाय नम:"

मंगळ गायत्री मंत्र

"ॐ क्षिति पुत्राय विदमहे लोहितांगाय धीमहि-तन्नो भौम: प्रचोदयात"

महामृत्युंजय मंत्र

ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्

उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्

ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ। (Mantra)

मंत्र जपाचे नियम

कुंडलीत प्रचलित असलेल्या मंगल दोषापासून मुक्ती मिळवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे मंगळाच्या या मंत्रांचा जप करणे. मंगळवारी सकाळी स्नान केल्यानंतर लाल रंगाचे कपडे घाला. आसनावर बसून या मंगळाच्या मंत्रांचा किमान एक जप करावा. मंगळवारी हनुमानजींना लाल वस्त्र आणि लाल सिंदूर अर्पण करा. असे केल्याने मंगल दोष समाप्त होईल.

अशा प्रकारे मंगळ दोष दूर करा

मंगळ दोष असलेल्या व्यक्तीने रोज हनुमान चालिसाचा पाठ करावा.

कडुलिंबाच्या झाडाची रोज पूजा करावी.

मांस आणि दारूपासून दूर राहिले पाहिजे.

भाऊ, बहीण, पत्नी यांच्याशी नाते जपावे. राग टाळावा.

ज्योतिषशास्त्रातील उपाय

मंगळ असलेल्या व्यक्तीने घागर, झाड किंवा मूर्तीसोबत पहिल्यांदा लग्न करावे. त्यामुळे वैवाहीक जीवनात अडचणी येत नाहीत.

मंगळ असलेल्या व्यक्तीला मूंगा घालण्याचा सल्ला दिला जातो.

हनुमानाची नित्य पूजा केल्यास मंगळ दोष दूर होतो.

मसूर, रक्तचंदन, लाल फुले, मिठाई आणि द्रव्य लाल कपड्यात गुंडाळून नदीत प्रवाहित केल्याने मंगल दोष दूर होतो. (Astro Tips)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT