प्रदूषण ही सध्या जगात वाढत जाणारी समस्या ठरतेय. खास करून वायू प्रदुषणाचे अनेक दुष्परिणाम निसर्गावर आणि आरोग्यावर होत असल्याच दिसून येतं आहे. यामुळे वायू प्रदूषण Pollution रोखण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक संघटना कार्यरत आहेत. Marathi Health Tips Sound Pollution Side effects on Health and Heart
एकीकडे वायू प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असताना ध्वनि प्रदूषणाकडे Sound Pollution मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. ध्वनि प्रदूषणाचे देखील आरोग्यावर नकळतपणे गंभीर परिणाम दिसून येत आहेत.
यामुळे आपलं आयुष्य घटत चाललं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या WHO अहवालानुसार, वायू प्रदूषणानंतर ध्वनी प्रदूषणाचे आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येत आहेत.
पॅरिस हेल्थ एजन्सीच्या अहवालानुसार, ध्वनी प्रदूषणामुळे पॅरिसमध्ये राहणाऱ्या लोकांचं सरासरी वय १०.७ महिन्यांनी कमी होत चाललंय.
मोठ्या आवाजामुळे शरीरात होतात बदल
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार ५३ डेलिबलपेक्षा जास्त ट्रॅफिकचा आवाज असल्यास तसचं ४५ डेसिबलपेक्षा जास्त विमानाचा आवाज असल्यास त्याचा व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होवू शकतो. यामुळे काही आजारांचा सामना करावा लागू शकतो.
संशोधनानुसार ट्राफिकच्या आवाजामध्ये जास्त काळ राहिल्याने ५ वर्षांमध्ये हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका अधिक वाढतो.
तर अमेरिकेत झालेल्या एका संशोधनानुसार जास्त मोठ्या आवाजामुळे मानवी शरीरात काही केमिकल रिलीज होतात. याचा आपल्या नर्व्हस सिस्टिमवर परिणाम होत असतो. तसचं यामुळे आपल्या हृदयचे ठोके तसचं बीपी वाढते.
हे देखिल वाचा-
आवाजांमुळे होत आहेत आजार
ध्वनी प्रदूषणाचा शारिरीक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. अनेकदा काही आवाजांमुळे आपली चिडचिड होते. तर काही आवाज सतत आपल्या कानावर पडत असतात. मात्र, आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. अशा आवाजांचा देखील आपल्यावर परिणाम होत असतो. यामुळे हायपर टेंशन, उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार होवू शकतात.
त्याचसोबत ध्ननी प्रदूषणाने ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होत असता. यामुळे लवकर बहिरेपण येऊ शकतं.
मानसिक आरोग्यावर परिणाम
आपला मेंदू हा कायम एखाद्या आवाजाने सावध होत असतो. परिणामी झोपेतही जर तुमच्या कानावर सतत आवाज येत असतील तर नैराश्य, चिंता आणि तणाव वाढू शकतो. तसंच याचा झोपेवरही परिणाम होतो. शांत आणि गाढ झोप न झाल्याने तसंच आवाजामुळे सतत झोपमोड झाल्याने चिडचिडेपणा वाढू शकतो. तसचं लक्ष केंद्रित करण्यास अडचण निर्माण होवू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.