How to improve Sleep Quality Esakal
लाइफस्टाइल

Sleep Quality: रात्री लवकर झोप लागत नाही, मग आजच बंद करा या सवयी, अंथरूणात जाताच सेकंदात येईल झोप

कोणत्या सवयींमुळे झोप येत नाही हे जाणून घेतल्यास त्या सवयी बदलून आपण रात्रीची शांत झोप घेऊ शकता. या चुकीच्या सवयी कोणत्या ते आज आपण जाणून घेणार आहोत.

Kirti Wadkar

How to improve Sleep Quality: अलिकडे बदललेल्या जीवनशैलीचा आपल्या अनेकांच्या झोपेवर Sleep मोठा परिणाम झाला आहे. दिवसभरातील धावपळीत जेवणाच्या आणि झोपेच्या वेळांचं गणित बिघडल्याने त्याचा परिणाम झोपेवर होऊ लागला आहे. Marathi Tips keep away these bad habits to get early sleep

याशिवाय कामाचा ताण Work Load, सोशल मीडियाचा वापर, अति विचार करणं, जास्त थकवा, चुकीचा आहार अशा अनेक गोष्टींचा तुमच्या झोपेवर परिणाम होत असतो. रात्री अंथरुणात पडूनही अनेकांना तासनतास झोप येत नाही. परिणामी दुसरा दिवसही उशीरा उजाडतो किंवा अपुरी झोप यामुळे शरीराच्या कार्याचं संपूर्ण चक्रच Body Cycle बिघडतं.

परिणामी याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर Health होत असतो. खरं तर वेळेत झोप येणं आणि शांत झोप लागणं हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणजेच जर तुम्ही वेळेत काही सवयी बदलल्या तर तुम्हाला देखील अंथरुणात जाताच झोप लागू शकते.

कोणत्या सवयींमुळे झोप येत नाही हे जाणून घेतल्यास त्या सवयी बदलून आपण रात्रीची शांत झोप घेऊ शकता. या चुकीच्या सवयी कोणत्या ते आज आपण जाणून घेणार आहोत.

झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर- अलिकडे सोशल मीडियामुळे रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर वाढू लागला आहे. दिवसभर कामासाठी लॅपटॉप किंवा मोबाईलचा वापर होतो. तर घरी आल्यानंतर काही तरी मनोरंजन व्हावं या उद्देशाने अनेक सगळी काम आटोपल्यावर अंथरुणात पडल्यावर मोबाईल फोन हातात घेतात.

तुम्हाला वेळेत झोपायचं असेल तर झोपण्यापूर्वी अर्धातास आधीत मोबाईल फोन दूर ठेवा. इतकचं नव्हे तर तुमच्या सोशल मीडियाच्या सर्व नोटिफेकेशनही बंद करा. जेणेकरून तुम्हाला फोन पुन्हा पुन्हा हातात घेण्याचा मोह होणार नाही.

रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर केल्याने फोनमधून निघणारी आर्टिफिशियल लाईट मेंदूला जागं राहण्याचे संकेत देत राहते. मोबाईलचा प्रकाश डोळ्यांना दिवसाप्रमाणे भासत असल्याने मेंदूला रात्री देखील दिवस असल्याचे संकेत मिळत राहतात. याचा परिणाम आपल्या मेंदूच्या कार्यावर होतो (circadian rhythm) आणि आपल्याला झोप येत नाही.

हे देखिल वाचा-

रात्री एक्सरसाइज करणं- फिट राहण्यासाठी एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र ती योग्य वेळी करणं त्याहून अधिक महत्वाचं आहे. तज्ञांच्या मते रात्री व्यायाम करणं टाळावं. दिवसभर कामामुळे वेळ मिळत नसल्याने अनेकजण रात्री जीममध्ये जातात. मात्र रात्री जीम करणं चुकीचं आहे.

रात्री एक्सरसाइज केल्याने हार्ट रेट वाढतो आणि नर्व्हस सिस्टिम जलद काम करू लागते. आरोग्यासाठी हे हानिकारक ठरू शकतं. तसचं अनेकदा एक्सरसाइज केल्याने शरीर आणि मेंदू उत्तेजित झाल्याने तुम्हाला फ्रेश वाटतं. त्यामुळे अर्थातच तुम्हाला रात्री लगेच झोप लागण्यास अडचण निर्माण होते.

चहा कॉफीचं अधिक सेवन- कॅफेनयुक्त पेयांमुळे झोप येत नाही. यासाठीच रात्री झोपण्यापूर्वी चहा, कॉफी तसचं सॉफ्ट ड्रिंक्सचं देखील सेवन टाळावं. एवढचं नव्हे तर दुपारनंतर जास्त चहा किंवा कॉफीसारख्या कॅफेनयुक्त पेयांचा तुमच्या झोपेवर परिणाम होत असतो.

कॅफेनचा प्रभाव आपल्या शरीरामध्ये जास्त काळासाठी टिकून राहतो. कॅफेन आपल्या शरीरात एड्रिनल हार्मोन्स वाढवण्यास मदत करत. ज्यामुळे आपण बरेच तास सक्रिय आणि एनर्जेटिक राहतो. अनेकजण ऑफिसमधून निघतना चहा किंवा कॉफी पितात परिणामी रात्री झोप लागत नाही. यासाठी सकाळच्या वेळी चहा किंवा कॉफीचं सेवन करणं कधीही योग्य.

सुस्त जीवनशैली- अनेकजण अलिकडे ऑफिसमध्ये दिवसभर एकाच जागी बसून काम करतात. तुमच्या कामाचा ताण कितीही असला तरी अशा कामांमध्ये तुमचं शरीर सक्रिय राहत नाही.

तसचं ऑपिसमधून घरी आल्यानंतरही टीव्ही किंवा मोबाईल हातात घेऊन एका जागी बसून राहतात. हे देखील रात्री झोप न येण्यासाठीच एक कारण आहे. यासाठी जेवल्यानंतर एखादा वॉक घेणं किंवा सक्रिय राहणं गरजेचं आहे.

अयोग्य आहार- रात्री उशीरापर्यंत पार्टी करणं किंवा कामाच्या स्वरुपामुळे रात्री उशीरा जेवणं, तसचं रात्री उशिरा चुकीचे पदार्थ खाण यामुळे देखील झोप लागण्यास अडचण निर्माण होते. रात्री पचनसंस्था मंद गतीने काम करत असते.

अशात चुकीचा आहार घेतल्याने योग्य पचन न झाल्यास पचनाचा त्रास होतो. यामुळे रात्री पोटफुगी, गॅस, छातीत जळजळ किंवा डोकेदुखी सारख्या समस्या निर्माण होवून झोप लागण्यास अडचण निर्माण होते.

या चुकीच्या सवयी तुम्ही वेळीच बंद केल्या तर तुम्हाला अंथरुणात पडताच अगदी काही मिनिटांमध्ये गाढ आणि शांत झोप लागण्यास मदत होईल. पुरेशी झोप झाल्याने तुमचा दिवसही चांगला जाईल शिवाय यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या कमी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT