‘लाडकी बहीण’ sakal
लाइफस्टाइल

‘लाडकी बहीण’

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी; त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी; त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ही योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील महिला-मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगारनिर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक-सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांच्या सशक्तीकरणास चालना देणे; तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. २१ ते ६५ वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला योजनेच्या लाभार्थी आहेत.

पात्रता कालावधीदरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वत:च्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतर सक्षम बॅक खात्यात दरमहा दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य सरकारच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा कमी लाभ घेत असले तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल.

लाभार्थ्यांसाठी पात्रता

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक

  • किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्षे पूर्ण असावीत

  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे

  • आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, जन्म दाखला

  • सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला

  • बॅंक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, रेशनकार्ड

अर्जांसाठीची प्रक्रिया

  • अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन भरावेत

  • अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, नागरी/ग्रामीण/आदिवासी/ग्रामपंचायत/वॉर्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध

अर्ज प्रक्रिया विनामूल्य

  • अर्जदार महिला अर्ज करताना उपस्थित असणे आवश्यक, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल

  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल/ॲपवर जाहीर केली जाईल. त्याची प्रत अंगणवाडी केंद्र/ग्रामपंचायत, वॉर्ड स्तरावरील सूचना फलकावर लावण्यात येईल.

(शब्दांकन : मीनाक्षी गुरव)

अंमलबजावणीचा कालावधी

तपशील कालावधी

अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात : १ जुलैपासून

अर्ज प्राप्त करण्याची मुदत : ३१ ऑगस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : पोर्टलवर खताचा साठा भरपूर, पण तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी संकटात

Samsung Discount Offer : चक्क 24 हजारपेक्षा जास्त डिस्काउंट; सॅमसंगच्या 'या' प्रीमियम स्मार्टफोनवर बंपर सूट

Ind-US ट्रे़ड डील फायनल होणार? डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर, परराष्ट्र मंत्र्यालयाने नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT