Monsoon Pet Care:  Sakal
लाइफस्टाइल

Monsoon Pet Care: पाळीव प्राण्यांना पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा धोका, काळजी घेणे आवश्यक

Monsoon Pet Care: पावसाळ्यात घरातील पाळीव प्राण्यांना अनेक संसर्गजन्य आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यात पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याची गरज असते.

सकाळ वृत्तसेवा

Monsoon Pet Care: अनेकांसाठी पाळीव प्राणी हे त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे असतात. अनेकांच्या घरात देशी-विदेशी श्वान, मांजर, ससा, परदेशी पक्षी असतात. मात्र, पावसाळ्यात त्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. पाऊस सुरू झाला की, साथीचे आजार बळावतात. अशात माणसांसोबतच घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात घरातील पाळीव प्राण्यांना अनेक संसर्गजन्य आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यात पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याची गरज असते.

पावसाळ्यात बहुतेक पाळीव प्राण्यांना भेडसावणाऱ्या गोचीड आणि पिसवा या नेहमीच्या समस्या आहेत. त्यांनी अस्वच्छ पाणी प्यायले तर आतड्यांसंबंधी आणि पोटाचे विकार होऊ शकतात. पावसाळ्यात नियमित ग्रुमिंग करणे गरजेचे असते. लांब फर असलेला कुत्रा आणि मांजर यांची योग्यरीत्या देखभाल न केल्यास जिवाणू आणि बुरशीचे देखील आजार होऊ शकतात. पावसाळ्यामध्ये दोन महिने ते दीड वर्षापर्यंत वय असणाऱ्या लहान श्वानांना गॅस्ट्रो होण्याचा धोका सर्वाधिक असतो. तसेच, पावसाळ्यापूर्वी त्यांचे लसीकरण करणे आवश्यक असते.

नेमके काय करावे?

भिजल्यावर त्यांना सुती टॉवेलने स्वच्छ पुसून घ्या. तसेच, त्यांना झोपण्यासाठी उबदार कापड ठेवा.

ओलसर वातावरणामुळे गोचिड आणि पिसवांची संख्या वाढते. यामुळे तुमच्या घरातल्या प्राण्यांचे आवश्यक लसीकरण करून घ्यावे.

पावसाळ्यात या प्राण्यांची घरातच खेळण्याची सोय करा.

स्वच्छ भांड्यात खायला द्या. त्यांना वेळोवेळी अन्न देत राहा.

कॅनाइन पार्व्होव्हायरस व लेप्टोस्पायरोसिसला प्रतिबंध करण्यासाठी तुमच्या पाळीव प्राण्याचे लसीकरण करून घ्या.

पाळीव प्राण्यांपासून कीटकनाशके दूर ठेवा.

बाहेरून आल्यानंतर घरातील श्वान किंवा मांजरीचे पंजे साफ करा. यामुळे त्यांना संसर्ग होणार नाही.

ढगांच्या गडगडाटामुळे प्राणी घाबरतात. त्यामुळे ते अस्वस्थ होतात. त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे द्या.

प्राण्यांचे पोट वेळेवर रिकामे होईल, याची काळजी घ्या.

प्राणी आनंदी राहण्यासाठी त्यांना वेळ द्या, त्यांच्याबरोबर खेळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रेकिंगला जाते सांगून लोणावळ्याला गेली; मुंबईत LLB करणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा ४०० फूट खोल दरीत आढळला मृतदेह

Pune News: पुणे बनणार संरक्षण अर्थकारणाचे संशोधन हब: जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, सांगवीत ‘एनएडीएफएम’च्या संकुलाची उभारणी!

Latest Marathi News Live Update : भारतावरील आयातशुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्के करणार; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Pune News: टायगर पॉइंट दरीत आढळला तरुणीचा मृतदेह; नवी मुंबईच्या श्रेया पती यांचा मृत्यू, लोणावळ्यात नेमकं काय घडलं!

Ajit Pawar Plane Crash : विमान अपघातानंतर अजित पवार यांची ओळख घड्याळामुळे नव्हे तर दुसऱ्या कारणामुळे पटली; पोलिस सुत्रांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT