Monsoon Travel Places  esakal
लाइफस्टाइल

Monsoon Travel Places : चिंब भिजलेले, रूप सजलेले..! घाटातील धुके अन् धबधबे पाहण्यासाठी महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणांना नक्की द्या भेट

Monsoon Travel Places : पावसाळा म्हटलं की हिरवागार निसर्ग आणि पांढरेशुभ्र धबधबे.

Monika Lonkar –Kumbhar

Monsoon Travel Places : देशातील अनेक भागांमध्ये पावसाने सध्या दमदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात ही पावसाने जोरदार बॅटिंग केली असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. एकूणच काय तर महाराष्ट्रात मोठ्या दिमाखात हा मान्सून दाखल झाला आहे.

पावसाळा म्हटलं की हिरवागार निसर्ग आणि पांढरेशुभ्र धबधबे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी छोटेमोठे धबधबे पाहण्यासाठी आणि वर्षाविहारासाठी पर्यटक गर्दी करतात. यंदाच्या पावसाळ्यात तुम्ही देखील फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील काही सुप्रसिद्ध ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या लोकप्रिय ठिकाणांबद्दल.

लोणावळा

लोणावळा हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन केंद्र आहे. या ठिकाणी १२ ही महिने पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. लोणावळा घाटातील विविध पॉईंट्स आणि समृद्ध निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी मोठी गर्दी करतात.

पावसाळ्यात तर येथील दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे असते. वळणदार घाट, हिरवळ, डोंगर आणि घाटातील छोटे-मोठे पांढरेशुभ्र धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. यंदाच्या पावसाळ्यात तुम्ही देखील या ठिकाणी फिरण्याचा आनंद घेऊ शकता.

नाणेघाट धबधबा

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात हा धबधबा स्थित आहे. पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेला हा धबधबा ‘उलटा धबधबा’ म्हणून ही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी हवेचा दाब हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे धबधब्याचे पाणी उलट्या दिशेने फिरते. त्यामुळे, पर्यटकांमध्ये हा उलटा धबधबा म्हणून विशेष लोकप्रिय आहे.  

या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तुम्ही देखील यंदाच्या पावसाळ्यात या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. परंतु, पुरेशी काळजी घेऊन या ठिकाणी फिरायला जा.

ताम्हिणी घाट

पुण्यापासून ४० किमीच्या अंतरावर असणारा हा ताम्हिणी घाट निसर्गाने समृद्ध आहे. हा घाट पावसाळ्यात हिरवागार होऊन जातो. शिवाय, पावसाळ्यात या घाटात अनेक छोटे-मोठे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी आणि धबधब्यामध्ये भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही यंदाच्या पावसाळ्यात या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता.

अंधारबन ट्रेक

पुण्याजवळच्या ताम्हिणी घाटात स्थित असलेला हा अंधारबन ट्रेक पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. जर तुम्हाला पावसात भिजण्यासोबतच मस्त ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल तर हा अंधारबन ट्रेक सर्वोत्तम आहे.

हा ट्रेक ताम्हिणीच्या जंगलातून जातो. वाटेत तुम्हाला अनेक नाले आणि छोटे धबधबे दिसतील. अंधारबन ट्रेकला पोहचल्यावर तुम्ही आजूबाजूचे नयनरम्य दृश्य पाहून सर्व काही विसरून जाल. यात काही शंका नाही. इतका हा नजारा पाहण्यासारखा असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT