Yoga Poses For Neck Pain: Sakal
लाइफस्टाइल

Yoga Poses For Neck Pain: फोनच्या अतिवापरामुळे मान दुखतेय? मग, करा 'हे' सोपे व्यायाम

Yoga Poses For Neck Pain: फोनचा अतिवापर केल्यामुळे मान दुखीचा त्रास वाढू शकतो. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही काही सोपे योगा करू शकता.

पुजा बोनकिले

nack ache using too much mobile try these yoga for relief

आजकाल सर्वच लोकांकडे मोबाईल आहे. त्याचा विविध कामांसाठी वापर केला जातो. फोनचा अतिवापर केल्याने मान दुखू शकते आणि मानेच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो. हा त्रास कमी करण्यासाठी पुढील व्यायाम करू शकता. हे व्यायाम कसे करावे हे जाणून घेऊया.

मानदुखी कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावे

  • मानेला स्ट्रेचिंग करावे

मानेचे स्नायू ताणल्याने वेदना कमी होऊ शकतात.

कसे करावे

यासाठी खाली बसा किंवा सरळ उभे रहा.

तुमचे डोके हळूहळू एका बाजूला झुकवा, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मानेच्या विरुद्ध बाजूला ताण जाणवत नाही.

15-30 सेकंद या अवस्थेत राहावे.

दुसऱ्या बाजूला पुन्हा असे करावे.

  • हनुवटी समोर झुकवा

हे स्नायूंना बळकट करण्यास मदत करते.

कसे करावे

सर्वात पहिले सरळ बसा किंवा उभे रहा.

तुमची हनुवटी हळुवारपणे तुमच्या छातीकडे झुकवण्याचा प्रयत्न करावा.

5-10 सेकंद तसेच राहा.

10 वेळा पुन्हा करा.

  • खांद्याचा व्यायाम

हा व्यायाम केल्याने मानदुखी कमी होऊ शकते.

कसे करावे

हा व्यायाम करताना सर्वात आधी सरळ बसा किंवा उभे राहा.

आपले दोन्ही खांदे मागच्या बाजुला ताण येईल असे झुकवा.

5-10 सेकंद या स्थितीत राहावे.

असेच पुन्हा 10 वेळा करावे.

  • अप्पर ट्रॅपेझियस स्ट्रेच

कसे करावे

हा व्यायाम करण्यासाठी सर्वात पहिले सरळ बसा किंवा सरळ उभे रहा.

हळूवारपणे आपले डोके एका बाजूला झुकवावे.

त्याच बाजूला आपले डोके हळूवारपणे झुकवण्यासाठी हाताचा वापर करू शकता.

असे 15-30 सेकंद धरून ठेवा. नंतर सरळ स्थितीत यावे.

प्रत्येक बाजूला 2-3 वेळा असे पुन्हा करा.

  • लेव्हेटर स्कॅप्युले

कसे करावे

हा व्यायाम करण्यासाठी सर्वात पहिले एका शांत ठिकाणी खाली बसा किंवा सरळ उभे रहा.

आपले डोके एका बाजूला फिरवा आणि थोडेसे खाली वाकवा.

तुमचा हात तुमच्या डोक्याच्या मागच्या बाजूला त्याच बाजूला ठेवा आणि ताण वाढवण्यासाठी हळूवारपणे दाब द्या.

15-30 सेकंद धरून ठेवावे.

प्रत्येक बाजूला 2-3 वेळा पुन्हा करा.

  • मान फिरवणे

मान फिरवल्याने मानेचे स्नायु लवचिक होतात.

कसे करावे

हा व्यायाम करण्यासाठी सर्वात पहिले सरळ बसा किंवा सरळ उभे रहा.

तुमचे डोके हळुहळू उजवीकडे आरामात फिरवा.

काही सेकंद धरून ठेवा, नंतर परत मान सरळ ठेवा.

पुन्हा डाव्या बाजूला असे करावे.

असे 10 वेळा करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळराजे, रक्षाबंधनाच्या दिवशीच तुझं जाणं वेदनादायक; लाडक्या भावाला अखेरचा निरोप, रुपाली चाकणकरांवर शोककळा

Latest Marathi News Updates : इलेक्शन कमिशन स्वतः मूर्ख आहे! प्रकाश आंबेडकरांची आगपाखड

Cyber Fraud : नाशिकमध्ये 'डिजिटल अरेस्ट'चा नवा फतवा, तिघांना १ कोटी रुपयांचा गंडा

Youth Protest: अतिक्रमण हटविण्यासाठी तरुणाचे टॉवरवर आंदोलन

Dharani Rescue : धरालीत बचावकार्य युद्धपातळीवर; आठवडाभरात एक हजारहून अधिक जणांना सुरक्षित बाहेर काढले

SCROLL FOR NEXT