Nag Panchami: Sakal
लाइफस्टाइल

Nag Panchami: नागपंचमीला 'या' गोष्टी करणे मानले जाते अशुभ

Nag Panchami 2024: नागपंचमीला नागांची पूजा केली जाते. या दिवशी कोणते काम करणे टाळावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Nag Panchami: श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. या दिवसाला हिंदु धर्मात खुप महत्व आहे. यंदा नाग पंचमी ९ ऑगस्टला साजरी केली जाणीर आहे. या दिवशी नागांची मनोभावे पूजा केली जाते. नागदेवतेची पूजा केल्यने सर्प दोषापासून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच नाग प्रजातीचे रक्षण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी कोणत्या गोष्टी करणे टाळव्या हे जाणून घेऊया.

नागपंचमीला पुढील करू नये

नागपंचमीला सापांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये. सापांच्या प्रतिमेची पुजा करून त्याचे रक्षण करण्याची शपथ घ्यावी.

धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीला लोखंडी कढई किंवा तवा वापरू नये. यामुळे सर्पदेवाला त्रास होतो असे मानले जाते.

नागपंचमीला नागदेवतेला तांब्याच्या भांड्यात दूध अर्पण करू नये. नेहमी पितळीच्या भांड्याचा वापर करावा.

नागपंचमीला जमिनीची खुरपणी, शेतातील गवत काढणे यासारख्या गोष्टी करणे टाळाव्यात. कारण जमिनित असलेल्या सापांच्या बिळाला नुकसान होऊ शकते.

चाकु,सुई यासारख्या धारदार वस्तूंचा वापर या दिवशी वापर करणे अशुभ मानले जाते.

पूजा करण्याची योग्य वेळ

हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्यात शुल्क पक्षातील पंचमी तिथी ९ ऑगटस्ला सकाळी १२ वाजून ३६ मिनिटांनी सुरू होणार असून १० ऑगस्टला सकाळी ३ वाजून १४ मिनिटांनी समाप्त होणार आहे. नागदेवताच्या प्रतिमेची पूजा ९ ऑगस्टला सकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी १ वाजेपर्यंत करता येणार आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT