coriander-seeds 
लाइफस्टाइल

धण्यांच्या अतिवापरामुळे निर्माण होतात शारीरिक समस्या

धणे खाल्ल्यामुळे निर्माण होऊ शकतात 'या' शारीरिक समस्या

शर्वरी जोशी

कोणताही पारंपरिक पदार्थ करायचा म्हटलं की त्यात धण्यांचा वापर आवर्जुन केला जातो. हमखास वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ म्हणजे धणे. कोणताही पारंपरिक मसालेदार पदार्थ करायचा असेल तर त्यात धणे किंवा धणेपूड आवर्जुन वापरली जाते. पदार्थाची चव वाढवणाऱ्या धण्यांचे शारीरिक फायदे तर साऱ्यांनाच ठावूक असतील. अगदी पचनक्रिया सुरळीत करण्यापासून ते शरीरातील उष्णता नियंत्रणात ठेवण्यापर्यंत धणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, ज्या प्रमाणे धण्यांचा औषधी गुणधर्म आहे. त्याचप्रमाणे त्याचे काही शारीरिक तोटेदेखील आहेत. म्हणूनच, धण्याच्या अतिवापरामुळे कोणत्या समस्या निर्माण होतात ते पाहुयात. (nature-and-health-herbs-side-effects-of-coriander-seeds-ssj93)

१. पित्ताची समस्या निर्माण होणे -

अनेकदा लिवरविषयी समस्या असतील तर धणे खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त धन्याचं सेवन केलं तर पित्ताची समस्या उद्भवू शकते. अनेकदा शरीरातील पित्ताचं प्रमाण वाढतं. व त्यामुळे अनेक शारीरिक समस्या डोकं वर काढतात.

२. अॅलर्जी -

अनेक जणांना धण्याचं सेवन केल्यावर अॅलर्जी होते. शरीरावर रॅशेज येणे, श्वास घेण्यास अडथळा, खाज सुटणे, घसा सुजणे अशा समस्या निर्माण होतात.

३. स्त्रियासाठी त्रासदायक-

नुकत्याच आई झालेल्या स्त्रियांनी धण्यांचं सेवन करणं टाळावं. कारण, प्रमाणापेक्षा जास्त धणे खाल्ले कर ग्लँड सॅकरेशनवर त्याचा विपरित परिणाम होतो. ज्यामुळे नवजात बाळालासुद्धा त्रास होऊ शकतो.

४. श्वास घेण्यास अडथळा -

प्रमाणापेक्षा जास्त धणे खाल्ले तर श्वसनाशी निगडीत समस्या निर्माण होऊ शकतात. यात दम लागणे, श्वास घेण्यास अडथळा, छातीत दुखणे, घसा कोरडा पडणे या समस्या निर्माण होतात.

५. लो ब्लड शुगर-

धण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. मात्र, मधुमेहींनी प्रमाणापेक्षा जास्त धणे खाल्ले तर त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण एकदम कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG supply India news : आनंदाची बातमी! गॅस टंचाई दूर होणार, स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून २० हजार ४०० मेट्रिक टनाचे एलपीजी मुंबईकडे रवाना

Mumbai News: यूपी-बिहार आणि अन्य शहरातून येणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबईत परवडणारी घरे मिळणार; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Viral Video : विराट कोहलीची 'कॉपी' करायला गेला, बाबर आझम स्वतःच्याच जीवाशी खेळला... थोडक्यात वाचला, सर्व खेळाडू पळत आले...

Chhagan Bhujbal helicopter landing : हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये का उतरावं लागलं छगन भुजबळांनी सविस्तर सांगितलं

Monali Jadhav : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर मोनालीने पुणे शहर पोलीस दलात कॉन्स्टेबल पद मिळवत कुटुंबाचे स्वप्न केले साकार

SCROLL FOR NEXT