

Rental Housing In Mumbai For Outsiders
ESakal
नोकरी किंवा व्यवसायासाठी मुंबईत येणाऱ्या लोकांना महायुती सरकार परवडणारी भाड्याची घरे उपलब्ध करून देणार आहे. परवडणाऱ्या भाड्याच्या घरांसाठी एक चांगली प्रणाली विकसित करून तिची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. लोकांच्या सोयीसाठी संबंधित पोर्टल तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.