Navratri Fasting sakal
लाइफस्टाइल

Navratri Fasting Tips: नवरात्रीचे उपवास करताना गरोदर महिलांनी 'या' गोष्टींकडे करू नये दुर्लक्ष

गरोदर महिलांनी नवरात्रीचे उपवास करताना घ्या विशेष काळजी

Aishwarya Musale

नवरात्रीचा सण आजपासून म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. हिंदू धर्मात, नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र मानले जातात आणि दुर्गा देवीच्या उपासनेसाठी समर्पित आहेत. या दिवसांमध्ये देवीची पूजा करण्यासोबतच लोक उपवास करतात.

गरोदर महिलाही हे व्रत करतात. अशा परिस्थितीत गर्भवती महिलेने उपवास करताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून तिची प्रकृती बिघडणार नाही. जाणून घ्या गरोदरपणात नवरात्रीचे व्रत पाळण्यासाठी फास्टिंगच्या टिप्स.

गर्भधारणेदरम्यान उपवास करणे योग्य आहे का?

रिपोर्टनुसार, जर तुमचे आरोग्य चांगले असेल आणि शरीरात कोणत्याही पोषक तत्वांची कमतरता नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपवास करणे योग्य आहे. याचा गर्भाच्या आरोग्यावर, त्याच्या विकासावर आणि जन्मानंतर बाळाच्या बौद्धिक विकासावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही.

असा आहार ठेवा

- उपवास दरम्यान, 2 तासांच्या अंतराने थोडे थोडे खाणे चालू ठेवा.

- उपवासात नारळपाणी, ज्यूस यासारख्या लिक्विड पदार्थ प्या. यामुळे शरीराला पोषक द्रव्ये मिळतात.

- उपवासाच्या दिवशी कमीत कमी २ ते ३ अशी फळे खावीत जी तुम्हाला ऊर्जा देतात.

- फळे, दूध आणि काजू यांसारख्या फायबर आणि प्रथिनांनी दिवसाची सुरुवात करा.

- तुम्ही दिवसभर मिल्क शेक किंवा फ्रूट योगर्ट पर्यायही निवडू शकता.

- मध्येच भूक लागल्यास मखणा, काजू यांसारख्या गोष्टी खाऊ शकता.

ही खबरदारी घ्या

- गर्भवती महिलांनी निर्जल उपवास करू नये.

- गरोदरपणात जास्त वेळ उपाशी राहणे टाळावे.

- या काळात डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

- उपवासात जास्त मीठ किंवा साखर खाणे टाळा.

- उपवास करताना मुलाच्या हालचालींची काळजी घ्या.

- तळलेले पदार्थ टाळा.

- चहा-कॉफीचे जास्त सेवन करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: राजकारणात मोठा ट्विस्ट! काकांनी नाकारलं; पवार–शिंदे युतीमुळे नवं समीकरण तयार होणार? पुण्यात पडद्यामागे घडामोडी

Smith Surpasses Dravid: ऑस्ट्रेलिया 'बॉक्सिंग डे' टेस्ट हरले, पण कर्णधार स्मिथने द्रविड-कोहलीला मागे टाकत रचले मोठे विक्रम

Nagpur Municipal Election : ...तर एकत्र लढणार ‘महाविकास आघाडी’; काँग्रेसकडून ३२ जागा सोडण्याची शक्यता

Viral Video: विराट कोहलीचा व्हिडिओ काढण्यासाठी एका ड्रायव्हरने लढवली अनोखी शक्कल, नेटकरी म्हणाले...

Crime News : 'पीडितेने जबाब बदलला तरीही...' मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला हायकोर्टाचा मोठा झटका

SCROLL FOR NEXT