Navratri 2024:  Sakal
लाइफस्टाइल

Navratri 2024: नवरात्रीत नारळाचे करा 'हे' सोपे उपाय, मेहनतीचे योग्य फळ मिळेल

Navratri 2024: आज नवरात्रीचा दूसरा दिवस असून माता ब्रम्हाचारिणीला समर्पित आहे. या दिवसांमध्ये नारळासंबंधित काही सोपे उपाय केल्यास तुम्ही केलेल्या परिश्रमाचे योग्य फळ मिळेल.

Puja Bonkile

Navratri 2024: शारदीय नवरात्रीला ३ ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. शारदीय नवरात्रीला हिंदू धर्मात पवित्र सण मानला जातो. नऊ रात्रीत माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. देशभरात नवरात्रीचा उत्साहा आनंदात साजरा केला जातो.

आज नवराजत्रीचा दुसरा दिवस असून माता ब्रम्हाचारिणीला समर्पित आहे. नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केल्यास घरात सुख-शांती लाभते तसेच अडकलेल्या कामात यश मिळते.

नारळाचे पुढील उपाय करावे

यश मिळणे

तुम्हाला कष्ट करून सुद्धा यश मिळत नसेल तर नवरात्रीत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पिधीवत आणि मनोभावे पूजा करावी. तसेच नारळ पिवळ्या कपड्यात गुंडाळून अर्पण करावे. असे केल्यास तुम्हाला कष्टाचे फळ लवकर मिळेल.

शनिदोष दूर

नवरात्रीत नारळासंबंधित उपाय केल्यास शनिदोष कमी होऊ शकतो. यासाठी कोणत्याही नदीत नारळ घेऊन तो ओम रामदुताय नम: मंत्राचा जप करून अर्पण करावा. असे केल्याने शनिदेवाचा नकारात्मक प्रभाव कमी होऊ शकतो. तसेच शनिदेव प्रसन्न होतील.

नकारात्मक ऊर्जा

जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर शारदीय नवरात्रीमध्ये एका लाल कपड्यात नारळ बांधून श्रीगणेशाला अर्पण करावे. हे नारळ मुख्य प्रवेश दारावर लावावे. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते.

आर्थिक समस्या

नवरात्रीत नारळाचे काही सोपे उपाय केल्यास आर्थिक समस्या कमी होऊ शकते. यासाठी सकाळी गणपती बाप्पाला आणि महालक्ष्मीलचे पूजन करावे. पूजेत एक नारळ ठेवावे. पूजा झाल्यावर नारळ तिजोरीत ठेवावे. नंतर रात्री नारळ काढून प्रार्थना करत गणपती बाप्पाच्या मंदिरात अर्पण करावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT