Navratri Colour 2024 Sakal
लाइफस्टाइल

Navratri Colour: आज नवरात्रीचा शुभ रंग गुलाबी, मराठमोळा लूक हवा असेल तर मराठी अभिनेत्रींकडून घ्या आउटफिटची आयडिया

Navratri Colour: आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे. आजचा शुभ गुलाबी आहे. तुम्हाला आज स्टायलिश आणि सुंदर दिसायचे असेल तर मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून आउटफिटची आयडिया घेऊ शकता.

पुजा बोनकिले

Navratri 8th Colour: शारदीय नवरात्रीचा उत्साह देशभरात आनंदात साजरा केला जात आहे. सर्वत्र भक्तीमय आणि मंगलमय वातावरण आहे. नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

नवरात्रीच्या प्रत्येक दिवसासाठी खास रंग निवडण्यात आला आहे. नवरात्रीच्या आठव्या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. गुलाबी रंग हा शांतात, आत्मविश्वास, जबाबदारीचे प्रतिक आहे.

तुम्हाला आज गुलाबी साडीत क्लासी, सुंदर आणि मराठमोळा लूक हवा असेल तर मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून कल्पना घेऊ शकता. तुम्हा हा लूक कॅरी करून ऑफिस किंवा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये जाऊ शकता. तुमचा लूक पाहून सर्वजण तुमचे खुप कौतुक करतील.

pooja sawant

नवरात्रीच्या आठव्या दिवशी शुभ रंग गुलाबी आहे. तुम्हाला देवीच्या दर्शनासाठी खास लूक करायचा असेल तर पूजा सांवतसारखा लूक कॅरी करू शकता. गळ्यात आणि हातात गोल्डन गादिने घालू शकता. कानात झुमके घातल्यास सौंदर्य अधिक वाढेल. तुम्ही हेअरस्टाइल करू शकता किंवा केस मोकळे ठेऊ शकता.

tejaswini pandit

तेजस्वीनी पंडितसारखा लूक कॅऱी करून ऑफिस किंवा कोणत्याही कार्यक्रमाला जाऊ शकता या लूकमध्ये तुम्ही सुंदर दिसाल. गुलाबी साडीसोबत पांढरे ब्लाऊज घालू शकता. तसेच गळ्यात चोकर घालू शकता. यामुळे तुमचा लूक अधिक स्टायलिश दिसेल.

prarthana behere

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेकडून आउटफिटची आयडिया घेऊ शकता. गुलाबी साडीत ती खुप सुंदर दिसत आहे. यंदा नवरात्रीत गुलाबी साडी नेसायची असेल तर या पद्धतीने तयारी करू शकता.

ankita lokhande

अंकिता लोखंडे गुलाबी साडीत खुप सुंदर दिसत आहे. तुम्ही गुलाबी साढीवर गुलाबी मेकअप करू शकता. तसेच हातात हिरव्या बांगड्या घालू शकता. यामुळे तुमचा लूक अधिक चांगला दिसेल.

mansi naik

मानसि नाइकप्रमाणे गुलाबी साडीत लूक कॅरी करू शकता. कानात लांब झुमके आणि हातात गुलाबी बांगड्या परिधान करू शकता. या साडीसोबत गोल गळ्याचे ब्लाऊज घालू शकता. नाकात नथ घातल्यास अधिक सुंदर दिसाल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT