Navratri 2024| Homemade Face Pack Sakal
लाइफस्टाइल

Navratri Skin Care: नवरात्रीपुर्वी चेहऱ्यावर चमक हवीय? 'हे' घरगुती फेसपॅक वापरून पाहा

Navratri Skin Care: नवरात्रीत नऊ दिवस चेहऱ्यावर कमी खर्चात चमक हवी असेल तर घरगुती फेसपॅख वापरू शकता. तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन खुप पैसे खर्च करावे लागणार नाही.

Puja Bonkile

Homemade Facepack 2024: हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खुप महत्व आहे. अवघ्या दिवसावर नवरात्री उत्सव येऊन ठेपला आहे. यंदा ३ ऑक्टोबरला शारदीय नवरात्री साजरी केली जाणार आहे. देशभरात अनेक ठिकाणी शारदीय नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीचा उत्सव माता दुर्गाला समर्पित आहे. नवरात्रीत ९ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या दिवसामध्ये देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व संकट दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. अनेक लोक कपडे, सजावटीकडे लक्ष देतात. पण यामध्ये चेहऱ्याकेड दुर्लक्ष करतात. बाजारात अनेक बाजारात अनेक प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत, पण घरगुती उपायांनी बनवलेल्या गोष्टी त्वचेसाठी फायदेशीर असतात. तुम्ही काही घरगुती फेसपॅक वापरून नवरात्रीत चमकदार त्वचा मिळू शकता.

लिंबू आणि मध

तुमच्या घरी लिंबू आणि मध असेलच. याचा वापर करून फेसपॅख बनवू शकता. हे पॅक बनवण्यासाठी १ चमचा लिंबू रस, १ चमचा मध एका वाटीत घेऊन मिक्स करावे. नंतर चेहऱ्यावर लावावे. १५ मिनिटानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवावा.

हळद आणि बेसण

हळदीमध्ये असलेले पोषक घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तसेच हळद त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे. तुम्ही हळद आणि बेसण वापरून घरीच फेसपॅक बनवू शकता. हा फेस पॅक बनवण्यासाठी २ चमचे बेसण, १ चमचा हळद आणि १ चमचा दही एका वाटीत घेऊन चांगले मिक्स करावे. नंतर चेहऱ्यावर लावावे आणि १५ -२० मिनिटांनी हलक्या हाताने मसाज करून चेहरा स्वच्छ धुवावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: सीना माढा व खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT