Navratri Garba Night:  Sakal
लाइफस्टाइल

Navratri Garba Night: गरब्यात घागरा झालाय कॉमन, ट्रेंडी दिसायचं असेल तर फॉलो कर 'हे' इंडो-वेस्टर्न लुक्स

Navratri Garba Night: यंदा नवरात्रीत गरबा खेळताना घागरा परिधान करायचा नसेल तर ट्रेंडी इंडो-वेस्टर्न ड्रेस किंवा साडी कॅरी करू शकता. ज्यामुळे तुम्ही अधिक ग्लॅमरस दिसाल.

पुजा बोनकिले

Navratri Garba Night: शारदीय नवरात्रीला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. शारदीय नवरात्रीत माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. देशभरात नवरात्रीचा उत्साह पाहायाल मिळत आहे. नवरात्री देवीसमोर दांडिया आणि गरबा खेळला जातो. ज्यासाठी महिला अनेक नवीन पोशाख खरेदी करतात. जरी फक्त गरबा आणि दांडियाच्या रात्री घागरा परिधान केला जातो, परंतु जर तुम्हाला गरबा नाईटसाठी घागरा पिरधान करायाचा नसेल इंडो-वेस्टर्न लूक ट्राय करू शकता. यासाठी तुम्ही बॉलिवूड सेलेब्सच्या लूकची मदत घेऊ शकता.

शिल्पा शेट्टी

यंदा गरबा किंवा दांडिया खेळताना घागरा पिरदान करायाचा नसेल तर तुम्ही शिल्पा शेट्टीप्रमाणे इंडोवेस्टर्न साडी कॅरी करू शकता. तुम्ही प्री-ड्रेप केलेली साडी परिधान करून अधिक ग्लॅमरस दिसू शकता. तसेच खुले केस आणि सुंदर मेकअपमुळे तुमचे सर्व कौतुक करतील.

सोनाक्षी सिन्हा

फ्यूजन लुक कॅरी करण्यासाठी तुम्ही सोनाक्षी सिन्हाच्या या लुकमधून टिप्स घेऊ शकता . आयव्हरी रंगाचे जाकीट आणि बहुरंगी वर्क असलेले धोती स्कर्ट सेट तुमची गरबा टाईट अविस्मरणीय बनवू शकते. या ड्रेससोबत सोबत ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घेऊन तुमचा लुक पूर्ण करा.

कृती सेनन

तुम्हाला हटके आणि ग्लॅमरस लूक हवा असेल तर क्रिती सेननच्या लूकमधून टिप्स घेऊ शकता. हा लूक पूर्ण करण्यासाठी शरारासह क्रॉप टॉप घालू शकता आणि फ्लोअर लांबीचा श्रग घ्यावा लागेल. श्रग घातल्याने तुमचा लूक अधिक सुंदर दिसेल.

माधुरी दिक्षित

जर तुम्हाला धोती घालायला आवडत असेल तर असा लूक करू शकता. माधुरी दीक्षितसारखा धोती स्टाईलचा ड्रेस तुमच्या सौंदर्यात अधिक भर घालेल. असा ड्रेस बनवताना त्याच्या फिटिंगची विशेष काळजी घ्यावी. जर त्याचे फिटिंग योग्य नसेल तर तुमचा लुक खराब होऊ शकतो.

यंदा गरबा नाइटसाठी श्रद्धा कपूरकडून लूकची कल्पना घेऊ शकता. श्रद्धा नेहमीचा हटके स्टाइल करते यामुळे फॅशन सेन्ससाठी नेहमी चर्चेत असते. तुम्ही तिच्या ड्रेससारखा इंडो वेस्टर्न आउटफिट बनवू शकता. यामध्ये तुम्ही अधिक सुंदर दिसाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT