Navratri Kanya Puja 2024:  Sakal
लाइफस्टाइल

Navratri Kanya Puja 2024: कन्या पूजनाच्या दिवशी चुकूनही मुलींना 'या' भेटवस्तू देऊ नका, अन्यथा माता दुर्गा होईल नाराज

Navratri Kanya Puja 2024: नवरात्रीचा उपवास कन्या पूजन शिवाय अपूर्ण आहे. अष्टमी-नवमीच्या दिवशी लोक लहान मुलींना घरी जेवायला बोलावतात आणि भेटवस्तू देतात. पण कोणत्या गोष्टी भोटवस्तू म्हणून द्यावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Navratri Kanya Puja 2024: शारदीय नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. मान्यतेनुसार माता दुर्गेच्या रूपांची पूजा केल्यास सर्व मनोकामाना पूर्ण होतात आणि संकटे दूर होतात. नवरात्रीत नवमीला लहान मुलींना जेवणासाठी बोलावतात आणि पूजा करतात आणि भेटवस्तू देतात.

मान्यतेनुसार नवरात्रीचा उपवासाचे पूर्ण फळ तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही लहान मुलींना देवी मानून त्यांची पूजा करता. त्याला कन्यापूजा असेही म्हणतात.

नवरात्रीत देवीचे भक्त अष्टमी आणि नवमी तारखांना कन्या पूजा करतात. यंदा 11 ऑक्टोबर साजरी केली जाणार आहे. या दिवशी अष्टमी-नवमी एकाच दिवशी आले आहे. त्यामुळे अष्टमी आणि नवमीच्या दिवशी कन्यापूजा करणे शुभ मानले जात आहे.

कन्यापूजेच्या दिवशी 2-10 वयोगटातील लहान मुलींना बोलावणे जाते. मान्यतेनुसार लहान मुलींची पूजा केल्याने माता दुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. पण कन्यापूजनाच्या दिवशी पुढील चुका करू नका. अन्यथा माता दुर्गा नाराज होऊ शकते.

मुलींना कोणत्या गोष्टी भेटवस्तू देणे टाळावे

  • कन्यापूजेच्या वेळी लहान मुलींना स्टीलची भांडी किंवा प्लास्टिकच्या गोष्टी भेटवस्तू देऊ नका. कारण हिंदू धर्मात पूजेदरम्यान या गोष्टी अशुभ मानल्या जातात.

  • या दिवशी लहान मुलींना काचेच्या वस्तू किंवा धारदार वस्तू लहान मुलींना देऊ नका.

  • कन्यापूजेनंतर मुलींना कधीही काळे कपडे किंवा काळे रुमाल देऊ नका.

  • त्याऐवजी तुम्ही लाल रंगाची ओढणी किंवा लाल कपडे गिफ्ट करू शकता.

पुढील चुका करू नका

  • नवरात्रीत कन्यापूजनाच्या दिवशी लहान मुली घरी आल्यावर त्यांचे पहिले पाय धुवावे आणि नंतर त्यांना आसनावर बसवावे.

  • या दिवशी मुलींना जेवणात लसूण आणि कांदा असलेले पदार्थ देऊ नका. तुम्ही पुरी, भाजी या पदार्थांचा समावेश करावा.

  • लहान मुलींचा आशीर्वाद घ्यावा. त्याशिवाय त्यांना घराबाहेर जाऊ देऊ नका. अन्यथा माता दुर्गा नाराज होते.

  • मुलींना निरोप दिल्यानंतर लगेच घराची स्वच्छ करू नका.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT