Maha Navami 2024: Sakal
लाइफस्टाइल

Maha Navami 2024: नवरात्रीच्या महाअष्टमीला कन्यापूजनसाठी प्रसादात बनवा कोणते पदार्थ बनवाल? वाचा एका क्लिकवर

Maha Navami 2024: आज महाअष्टमीला कन्यापूजन केले जात आहे. मुलींच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे जाणून घेऊया.

पुजा बोनकिले

Maha Navami 2024: शारदीय नवरात्रीत महाअष्टमीला खुप महत्व असते. नवरात्रीत ९ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. मान्यतेनुसार असे केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. अष्टमीला लहान मुलींना देवी मानून अन्नदान करतात. हा दिवस सर्वत्र मोठ्या आनंदात साजरा करतात. आज मुलींना अन्न दान केल्यास माता गौरी प्रसन्न होते. यामुळे कोणत्या पदार्थांचा प्रसादात समावेश करावा हे जाणून घेऊया.

अष्टमीला कोणता प्रसाद बनवतात?

अष्टमीला प्रसादात शाहाकारी पदार्थ बनवतात. यात लसूण किंवा कांद्याचा वापर केला जात नाही. हा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. नंतर इतरांमध्ये वाटला जातो.

मुलींच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा

पुरी

पुरी करण्यासाठी पीठ मळून घ्यावे. नंतर लहान गोळे करून पुरी लाटून घ्यावी. नंतर तेलात सोनेरी होईपर्यंत तळावे.

बटाटा भाजी

तुम्ही लहान मुलींना अन्नदान करत असाल तर बटाट्याची भाजी बनवू शकता. यासाठी बटाटा बारिक कापून घ्यावे. नंतर तेलात सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावे. नंतर थोडी हळद आणि लाल तिखट टाका. नंतर मीठ टाका.

शिरा

कन्यापुजनात गोड पदार्थ म्हणून शीरा बनवू शकता. यासाठी एका कढईत रवा तूप गाळून चांगला भाजून घ्यावा. नंतर सुकामेवा टाकावे. नंतर दूध किंवा पाणी टाकून चांगले शिजू द्यावे. नंतर साखर घालावी.

कढी

तुम्ही कढी देखील बनवू शकता. यासाठी दही आणि बेसण एकत्र करावे. नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात, कढीपत्ता, हिंग, जीरं टाकावे आणि लगेच दही-बेसणचे मिश्रण मिक्स करावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT