Nita Ambani esakal
लाइफस्टाइल

Nita Ambani : नीता अंबानींसाठी वाराणसीत तयार होतेय स्पेशल सोन्याची साडी, हातमागाला नीता यांनी दिली भेट

अनंत अंबानी आणि राधिका यांच्या लग्नात नीता अंबानी आणि त्यांची आई ही साडी नेसणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Nita Ambani :

रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी नुकतेच वाराणसीतील काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. आपल्या मुलाच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी, नीता अंबानी यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी काशी विश्वनाथ, अन्नपूर्णा मंदिर आणि आई विशालाक्षीच्या दरबारात लग्नाची पत्रिका ठेवली.

यावेळी निता अंबानी यांनी मोकळ्या हाताने देणगीही दिली. नीता अंबानी यांनी काशी विश्वनाथ मंदिराला दीड कोटी रुपये आणि अन्नपूर्णा मंदिराला एक कोटी रुपये दान केले.

वाराणसीच्या मंदिरात आशिर्वाद घेतल्यानंतर नीता अंबानी यांनी वाराणसीचा स्पेशल चाटही चाखला. तर, तिथे जवळ असलेल्या विनकाम करणाऱ्या साडीच्या हातमाग कारखान्यालाही भेट दिली.  या कारखान्यात अनंतच्या लग्नासाठी स्पेशल साडी तयार केली जात आहे.

वाराणसीतील रामनगरमध्ये नीता अंबानी आणि त्यांच्या मातोश्रींसाठी सोन्याच्या जरीची साडी विनली जात आहे. चार महिन्यांपूर्वी रिलायन्स स्वदेशकडून मिळालेल्या ऑर्डरनुसार दोन ते तीन कारागीर सोन्याच्या जरीच्या आणि टेस्ट केलेल्या जरीच्या साड्या तयार करण्यात गुंतले आहेत.

नीता स्वत: काल रात्री विणकराच्या हातमागावर पोहोचल्या. तमागावर तयार होत असलेली साडी पाहण्यासाठी त्या रामनगरला गेल्या होत्या. कारागिराकडून साडीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची माहिती घेतली.

मुलगा अनंत आणि सून राधिका यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असलेल्या नीता यांनी साहित्यनाका येथील विणकर विजय मौर्य यांच्या घरी हातमागावर तयार होत असलेली साडी पाहण्यासाठी गेल्या.

श्री काशी विश्वनाथ मंदिरातून बाहेर पडल्यानंतर नीता म्हणाल्या की, मी आपल्या मुलाच्या लग्नानंतर पुन्हा येईन. नीता अंबानी आपला मुलगा आणि सुनेसाठी बनारसी कपडे खरेदी करेन असेही त्या म्हणाल्या.

नीता यांनी दशाश्वमेध घाटाच्या अंगा आरतीला हजेरी लावली. गंगा आरती पाहून त्या भावूक झाल्या होत्या. रिलायन्स स्वदेश फाऊंडेशनच्या माध्यमातून बनारसी विणकाम जागतिक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कारागिराकडून साडीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची माहिती घेतली. या हातमागावर काम करणारी ही मौर्य यांची पाचवी पिढी आहे. या पिढीतील विणकर विजय मौर्य यांचा मुलगा अनिकेत याने सांगितले की, सोन्याची जर असलेली साडी तयार केली जात आहे.

मुलगा अनंत अंबानी आणि राधिका यांच्या लग्नात नीता अंबानी आणि त्यांची आई ही साडी नेसणार आहेत. या साडीचा लूक आउट करण्यावर बंदी असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT