Nita Ambani esakal
लाइफस्टाइल

Nita Ambani : काशी विश्वनाथला जाऊन नीता अंबानींनी दिले अनंत-राधिकाच्या लग्नाचे आमंत्रण, मंदिराला केले तब्बल इतक्या कोटींचे दान

Neeta Ambani : नीता यांनी वाराणसीतील प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतले आणि अनंत-राधिकाच्या लग्नाचे आमंत्रण दिले.

Monika Lonkar –Kumbhar

Nita Ambani : रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरमन नीता अंबानी यांनी सोमवारी वाराणसीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी वाराणसीतील प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतले आणि अनंत-राधिकाच्या लग्नाचे आमंत्रण दिले.

नीता अंबानी आणि मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे १२ जुलैला मुंबईत लग्न पार पाडणार आहे. सध्या दोन्ही कुटुंबांमध्ये या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.

घरात कोणतेही शुभ कार्य असेल तर, सर्वात आधी परमेश्वराचे दर्शन घेतले जाते. नीता अंबानी यांनी काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेऊन कोटींची देणगी मंदिराला दिली आणि मुलाच्या लग्नासाठी संपूर्ण कुटुंबाच्या वतीने परमेश्वराला आमंत्रण पत्रिका अर्पण केली.

नीता यांनी यावेळी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाईन केलेली गुलाबी रंगाची साडी नेसली होती. काशी विश्वनाथची पूजा केल्यानंतर त्यांनी गंगा मातेची आरतीही केली आणि गंगा नदीला आमंत्रण पत्रिका अर्पण केली.

तब्बल १० वर्षांनी वाराणसीला दिली भेट

नीता अंबानी सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या चार्टर विमानाने वाराणसी विमानतळावर पोहोचल्या. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर त्या थेट काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पोहचल्या. कडक सुरक्षाव्यवस्थेसह त्यांनी काशी विश्वेशरचे दर्शन घेतले आणि अनंत-राधिकाच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका देवाला अर्पण केली. पूजा केल्यानंतर त्यांनी गंगा घाटावरील प्रसिद्ध आरती केली आणि तब्बल १.५१ कोटींचे दान मंदिराला केले.

मीडियासोबत संवाद साधताना नीता म्हणाल्या की, 'मी अनंत-राधिकाच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका काशी विश्वनाथच्या मंदिरात अर्पण केली आहे. पुढे त्या म्हणाल्या की, मी तब्बल १० वर्षांनी काशीला आले आहे. येथील विकास पाहून मला छान वाटले.

पुढे त्या म्हणाल्या की, येथे झालेले बदल आणि स्वच्छता पाहून भारावून गेले आहे. येथील गंगा आरतीमध्ये सहभागी होणे हा एक दैवी अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, त्यांनी गंगा मातेला ही लग्नासाठी आमंत्रित केले.

दीड कोटींची दिली देणगी

काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिल्यानंतर नीता अंबानी यांनी काशी विश्वनाथ मंदिराला तब्बल १.५१ कोटींची देणगी दिल्याचे काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. यासोबतच त्यांनी माता विशालाक्षी शक्तीपीठ आणि परिसरातील अन्नपूर्णा मंदिरात लग्नाची आमंत्रण पत्रिका अर्पण केली. त्यानंतर, नीता यांनी तेथील स्थानिक हॉटेलमध्ये जाऊन वाराणसी स्पेशल चाटचा आस्वाद घेतला. त्याचे फोटो ही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT