लाइफस्टाइल

Obesity: शंभरात १२ मुलांमध्ये आढळतो लठ्ठपणा ! लठ्ठपणात 'या' गंभीर आजारांची पाळेमुळे, तज्ञांनी दिली माहिती

मधुमेह, कॅन्सरपासून तर हृदयविकारापर्यंतच्या असंसर्ग आजाराची पाळेमुळे ही लठ्ठपणात दडली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Health News: मधुमेह, कॅन्सरपासून तर हृदयविकारापर्यंतच्या असंसर्ग आजाराची पाळेमुळे ही लठ्ठपणात दडली आहेत. विशेष असे की, देशातील एकूण मुलांपैकी बालपणी सुमारे १२.४ टक्के मुले लठ्ठ असतात. यापैकी ७० टक्के मुलांमध्ये मुले तरुणाईत आल्यानंतर लठ्ठपणा कायम राहतो, असे निरीक्षण ऑल इंडिया असोसिएशन फॉर ॲडव्हान्सिंग रिसर्च इन ओबेसिटी संघटनेकडून (एआयएएआरओ) नोंदवण्यात आले आहे.

उपराजधानीत १ ते ३ डिसेंबर दरम्यान हॉटेल रेडिसन ब्लू येथे लठ्ठपणावर आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मधुमेहरोग तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता, डायबिटिज असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अमोल मेश्राम, अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. अजय अंबाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

१ ते ३ डिसेंबर दरम्यान नागपुरात लठ्ठपणावर मोठी परिषद होणार आहे. २ आणि ३ डिसेंबरला येथील हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये परिषद होईल. ऑनलाइन पद्धतीने वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनच्या अध्यक्ष व मुळात ऑस्ट्रेलिया येथे राहणाऱ्या डॉ. लुईस बैर उपस्थित राहतील. डॉ. कविता गुप्ता यांनी आहारातून लठ्ठपणावर नियंत्रण मिळवता येत असल्याचा दावा केला. डॉ. सचिन गाथे यावेळी उपस्थित होते. (Latest Marathi News)


देशभरातील संघटनांचा सहभाग
ऑल इंडिया असोसिएशन फॉर ॲडव्हान्सिंग रिसर्च इन ओबेसिटी संघटनेतर्फे लठ्ठपणावर आयोजित परिषदेत डायबेटिज केअर फाउंडेशन ऑफ इंडिया, अकादमी ऑफ मेडिकल सायंसेस, डायटेटिक असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन डायटेटिक असोसिएशन (नागपूर शाखा) या संघटनांचाही सहभाग आहे. डॉ. बंशी बाबू, डॉ. लुईस बौर, डॉ. पराग सिंघल, डॉ. राकेश सहाय, डॉ. शशांक जोशी, डॉ. महेंद्र नरवरिया, डॉ.बी.एम. मक्कर, डॉ. सुनील गुप्ता, डॉ. अमोल मेश्राम, डॉ. कविता बक्षी या परिषदेत लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारांवर विविध अंगाने चर्चा करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT