papaya  sakal
लाइफस्टाइल

Papaya Face Pack: मऊ आणि नितळ त्वचा हवीये? तर पपईचा असा करा वापर

पपई आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पपईचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.

Aishwarya Musale

पपई आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पपईचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. तसेच पपईमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला खोलवर हायड्रेट करण्यास मदत करतात, ज्यामुळे आपली त्वचा मुरुम आणि पिग्मेंटेशनच्या समस्येपासून सुरक्षित राहते.

तसेच पपईमध्ये अँटी एजिंग गुणधर्म देखील असतात जे त्वचेवरील वृद्धत्वाच्या चिन्हांना आळा घालण्यास मदत करतात. आज आम्ही तुमच्यासाठी पपईचा फेसपॅक घेऊन आलो आहोत. या पपईच्या फेसपॅकचा वापर करून तुमची त्वचा मऊ, चमकदार आणि तरुण दिसते, तर चला मग जाणून घेऊया पपईचा फेसपॅक कसा बनवायचा.

फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • पपईचा 2 चमचे पल्प

  • काकडीचा 2 चमचे रस

  • मध अर्धा चमचा

papaya

असा बनवा पपईचा फेस पॅक

  • या पपईचा फेसपॅक बनवण्यासाठी सगळ्यात पहिले एक छोटी वाटी घ्या.

  • त्यांनतर त्यामध्ये पपईचा पल्प, काकडीचा रस आणि मध घाला.

  • तसेच यानंतर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून गुळगुळीत पेस्ट तयार करा.

  • यांनतर तुमचा पपईचा फेसपॅक तयार आहे.

papaya

या प्रकारे वापरा पपई फेस पॅक

  • सर्वात पहिले पपईचा फेसपॅक लावण्यापूर्वी तुम्ही चेहरा धुवून स्वच्छ करा.

  • त्यानंतर तयार केलेला पपईचा फेसपॅक आपल्या हलक्या हातांनी तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा.

  • हा पॅक चेहऱ्यावर लावून सुमारे 10-15 मिनिटे वाळवून घ्यावा.

  • नंतर नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करा.

  • तुम्ही चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून 3-4 वेळा हा पॅक वापरला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT