Parenting Tips  esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : मुलांना कुटुंबाची काळजी घ्यायची सवय लावायचीय?, तर बाप म्हणून तुम्हीही असे वागा, मुलं आपोआप शिकतील

मुलं हळूहळू मोठी होतात तेव्हा ते नकळत या गोष्टी शिकतात

Pooja Karande-Kadam

Parenting Tips : मुल लहान असल्यापासून मोठं होऊन तुला बाबांसारखंच व्हायचंय, इतरांची काळजी घ्यायची सगळ्यांवर प्रेम करायंचं हे बाबासारखंच तुलाही जमायला हवं,असं त्या बिचाऱ्याला ऐकवलं जातं. लहान मुलं तेव्हा त्या गोष्टीचा विचार करत आणि सोडून देतं. कारण, त्याला या गोष्टींची इतकी समज नसते.

अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की, वडिलांचे गुण सगळे मुलात उतरलेले असतात. शांत मनमोकळा स्वभाव, विचार करण्याची पात्रता या गोष्टी जन्मजात मुलाला वडिलांकडून मिळतात. पण, काही गोष्टी तो बाबांकडे पाहून शिकतो.

मुलं हळूहळू मोठी होतात तेव्हा ते नकळत या गोष्टी शिकतात. घरातील कुटुंब प्रमुख असणारे त्यांचे बाबा कसे वागतात, काय करतात याची ते कॉपी करू लागतात. बाबाच्या कृतीतूनच ते शिकतात.

त्यामुळे वयात येणाऱ्या मुलांसमोर कसे वागावे ही जबाबदारी पालकांवर येते. केवळ वडिल नाहीतर आईबाबतही ही भूमिका महत्त्वाची ठरते. अशावेळी वडिलांनी आपल्या मुलाची कोणती व्यक्ती बनवत आहे याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

तुमचा मुलगा सगळ्यांची काळजी करणारा, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर ते त्याला तुम्ही हे अशाप्रकारे शिकवू शकता.  

चूक मान्य करणे

वडील हे कुटुंब प्रमुख असतात. संपूर्ण घर त्याला घाबरते आणि त्यांच्या चुकांची माफी मागते. पण, वडील कोणाची माफी मागताना दिसत नाहीत. याचा अर्थ असा नाही की ते चुकत नाहीत. तेव्हा तुम्हीही एक बाप म्हणून तुमच्या चुकांबद्दल माफी मागणारी व्यक्ती व्हा. जेणेकरून तुमच्या मुलालाही समजेल की माफी मागून कोणीही लहान किंवा मोठा होत नाही, ही खूप सामान्य गोष्ट आहे.

अहंकाराला प्रोत्साहन देऊ नका

वडील म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला गर्विष्ठ बनवू नका हे खूप महत्वाचे आहे. तुमच्या मुलालाही अशा सवयी लागू नयेत म्हणून तुम्हाला स्वतःचा अहंकार दूर ठेवावा लागेल. तसेच, अहंकार, इगो बाळगला तर नाती तुटतात, व्यवसायात नुकसान होते, या गोष्टी मुलाला समजावून सांगा.

प्रेम व्यक्त करण्यासाठी

जेव्हा वडिलांच्या मनात आपल्या कुटुंबाबद्दल आणि विशेषत: आपल्या मुलाबद्दल प्रेमाची भावना असते. ते प्रेम व्यक्त करतात तेव्हा मुलगा देखील प्रेम व्यक्त करणारा माणूस बनतो. तो असा माणूस बनत नाही जो त्याच्या भावनांनी निराश होतो. (Parenting Tips)

आदर करणे

घरात कोणी लहान असो वा मोठा, तो आदरास पात्र असतो. मुलं वडिलांकडून ज्या गोष्टी शिकतात. त्यामध्ये त्यांचा आदर करायला शिकणंही महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादा पिता आपल्या मुलाचा, मुलीचा, पत्नीचा, त्याच्या आईचा आणि वडिलांचा आदर करतो, तेव्हा हा गुण मुलामध्येही येतो.

इतरांचे ऐकायला शिकवा

अनेकांना त्यांचे विचार कसे मांडायचे हे माहित असते पण फार कमी लोक त्यांचे ऐकतात. तुम्ही बसून सर्वांचे म्हणणे ऐकून समजून घेतले तर तुमच्या मुलांनाही हीच सवय लागेल. ते त्यांचे मत लादण्याऐवजी सर्वांचे ऐकण्याचा प्रयत्न करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT