Kangaroo Mother Care: Sakal
लाइफस्टाइल

Kangaroo Mother Care: 'कांगारू मदर केअर' म्हणजे काय अन् बाळाला कधी दिली जाते? वाचा सविस्तर

Kangaroo Mother Care: वेळेपूर्वी प्रसूतीमुळे जन्माला आलेल्या नवजात बाळाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून बचाव करण्यासाठी डॉक्टर कांगारू मदर केअरची मदत घेतात. चला तर मग जाणून घेऊया कंगारू मदर केअर म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत.

Puja Bonkile

Kangaroo Mother Care: नवजात बालकाचा जन्म होताच महिलांचे संपुर्ण आयुष्य बदलून जाते. अनेक डॉक्टर मातांना स्वत:ची काळजी घेण्याचा सल्ला देतात. हे करताना निष्काळजीपणा नवजात बाळाला अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडू शकतो. खास करून अकाली प्रसुती झालेल्या नवजात बाळांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

नवजात बाळाच्या विकासासाठी आईचे दूध खुप गरजेचे असते. परंतु मुदतीपुर्वी आईच्या स्तनांमध्ये दूध तयार होत नाही. यामुळे मुलांना आईचे दूध मिळत नाही आणि योग्य वाढ होत नाही. वेळेपूर्वी प्रसूतीमुळे जन्माला आलेल्या नवजात बाळाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून बचाव करण्यासाठी डॉक्टर कांगारू मदर केअरची मदत घेतात. चला तर मग जाणून घेऊया कंगारू मदर केअर म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत.

'कांगारू मदर केअर' म्हणजे नेमकं काय?

'कांगारू मदर केअर' हा एक नैसर्गिक उपाय आहे. यात मादी कांगारूप्रमाणे माता आपल्या नवजात बाळाला छातीजवळ धरते. या वैद्यकीय पद्धतीला इंग्रजीत स्किन टू स्किन कॉन्टेक्ट म्हणतात. या पद्धतीमध्ये माता नवजात बाळाच्या शरीराच्या त्वचेशी संपर्क येतो. सामान्य प्रसुतीच्या तुलनेत जन्मलेल्या बाळाची प्रतिकारशक्ती कमकुवत असते आणि त्यांचे वजनही कमी असते. यामुळे कांगारू मदर केअरचा सल्ला दिला जातो.

कोणाला दिली जाते कांगारू मदर केअर

नवजात बाळाच्या कमी वजनीमुळे आणि प्रसुतीमुले जन्मलेल्या बाळाला अनेक आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होतात. या समस्येपासून बचाव करण्यासाठी कांगारू मदर केअरचा सल्ला दिला जातो. डॉक्टरांच्या देखरेखीत ८ तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त करावी लागते.

माता बाळाला दीर्घकाळ स्तनपान करू शकते.

  • मूल स्तनपान करायला शिकते.

  • मुलाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले विकसित होते.

  • मूल आजार आणि संसर्गापासून सुरक्षित राहते.

  • मातेला मानसिक आनंद मिळतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT