parents google
लाइफस्टाइल

Parenting : महिला व पुरुषांमध्ये का कमी होतेय मुलांना जन्म देण्याची इच्छा ?

साधारणपणे लग्नानंतर कुटुंबात दोन अपत्ये होण्याची परंपरा सुरू असली तरी पुरुषांमध्ये मुलांची इच्छा कमी होत चालली आहे.

नमिता धुरी

मुंबई : काही वर्षांपूर्वीपर्यंत स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा ही नैसर्गिक साधनसंपत्ती सहज उपलब्ध होती जी आज क्वचितच उपलब्ध आहे. महागाईनेही लोक पिचले आहेत. याचाच परिणाम असा झाला आहे की, पोट भरण्याची धडपड पाहून लोकांमध्ये मुलांना जन्म देण्याची इच्छा झपाट्याने कमी झाली आहे.

१९५० च्या दशकात, एका महिलेला सरासरी ६ मुले होती. ५५ वर्षांनंतर, २००५च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात असे आढळून आले की, हे प्रमाण २.६८ पर्यंत खाली आले आहे आणि आता २ वर आले आहे. सुशिक्षित महिलांना कमी मुलं हवी असतात.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, हिमाचलमधील ४५ टक्के विवाहित पुरुषांना एकही मूल नको आहे तर ९३ टक्के महिलांना एकच मूल हवे आहे. हा ट्रेंड विचारात मोठा बदल दर्शवत आहे.

साधारणपणे लग्नानंतर कुटुंबात दोन अपत्ये होण्याची परंपरा सुरू असली तरी पुरुषांमध्ये मुलांची इच्छा कमी होत चालली आहे. हिमाचलमध्ये ४६.२ टक्के पुरुषांना दुसरे मूल नको आहे आणि ९४.६ टक्के पुरुषांना तिसरे अपत्य नको आहे.

राज्यातील बहुतांश महिलांना मुले हवी आहेत. हिमाचलच्या ९३.९ महिलांना नक्कीच मूल हवे आहे. पंजाबबद्दल बोलायचे झाले तर येथील ४३.८ टक्के पुरुषांना एकही मूल नको आहे. हरियाणामध्ये, 14.1 टक्के पुरुष म्हणतात की त्यांना मुले नको आहेत.

करिअरचे टेन्शन, उशिरा लग्न, उत्तम जीवनशैली ही मुले नको असण्याची सर्वात मोठी कारणे मानली जातात. मोठ्या शहरांमध्ये राहणारे लोक ३४-३५ वर्षांनंतर मुलांचे नियोजन सुरू करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: मारहाणीचे २३ व्हिडीओ अन् संतोष देशमुखांच्या पत्नी कोर्टाबाहेर धावल्या; वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

Hadapsar Accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भरधाव वाहनाची धडक; दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन बळी

Pune Cyber Fraud : सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच दिवशी ११ गुन्ह्यांची नोंद; दोन कोटी १६ लाखांची ऑनलाइन लूट!

Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी २०० कोटींची तरतूद; राज्यात १० मॉल उभे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

SCROLL FOR NEXT