योग्य नेतृत्व Leadership करण्यासाठी आणि एक चांगला लीडर बनण्यासाठी विचारमंथन करणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र अनेकदा विचारमंथन करत असताना अनेकजण भरकटतात. एखाद्या गोष्टीवर किंवा परिस्थितीचा जास्त विचार Thinking केला जातो.Personality Tips in Marathi Take Your Decisions Based on your Intuition
अतिविचारांच्या गर्तेत आपण कधी अडकतो हे आपल्यालाच कळत नाही. याचा परिणाम निर्णय क्षमतेवर होतो. नेतृत्व करत असताना योग्य आणि अचूक निर्णय Right Decision घेणं महत्वाचं असतं. अनेकदा एखादी परिस्थिती हाताळंण फारसं अवघड नसतं.
मात्र ओव्हर थिंकिंग म्हणजेच अतिविचारामुळे ताण Tension वाढतो काय निर्णय घ्यावा असा प्रश्न पडतो. यासाठीच कमी वेळेमध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी काही गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे.
प्रत्येक गोष्टीत परफेक्शन पाहू नका
कोणत्याही कामामध्ये परफेक्शन म्हणजे ते अचूक होणं गरजेचं असलं तरी याचे काही नकारात्मक परिणाम Negative Impacts देखील असतात. काम करेन तर परफेक्ट नाही तर करणारच नाही, असा यामागे अनेकदा विचार असतो. ही विचारसरणी अत्यंत चुकीची ठरू शकते.
यासाठी शांत राहून स्वत:ला विचारा की असा कोणता निर्णय आहे, ज्यामुळे तुमच्या प्राथमिकतेवर सकारात्मक परिणाम होईल. एखादं काम परफेक्ट किंवा बिनचुक होईल की नाही हे ते काम पूर्ण झाल्यावर कळू शकतं. मात्र त्यापूर्वी ते सुरू करणं किंवा त्यासाठी योग्य निर्णय घेणं जास्त गरजेचं असतं. यामुळेच परफेक्शनचा विचार करण्यापूर्वी परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणं जास्त गरजेचं असतं.
हे देखिल वाचा-
इंट्युशनचा फायदा घ्या
इंट्युशन किंवा स्वयंप्रेरणा म्हणजेच तुमच्या मनातील अशी भावना ज्यामुळे जेव्हा तुम्हाला सहज कळतं की तुम्ही करत असलेली एखादी गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे. पूर्वीच्या अनुभवांवरून आणि अंदाजावरून आपला मेंदू एखाद्या परिस्थितीचा किंवा व्यक्तीचा अंदाज बांधतो. त्यामुळे मेंदूच्या ताकदीचा फायदा घ्या.
संशोधनानुसार जर इंट्युशन म्हणजेच स्वयंप्रेरणा आणि विश्लेषणात्मक विचार याच्या मेळ साधून निर्णय घेतल्यास तो कायम योग्य ठरू शकतो. अंतर्ज्ञानाच्या जोरावर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता.
स्वत:साठी वेळ मर्यादा ठरवा
एखादा निर्णय घेत असताना त्या गोष्टीवर जास्त विचार करण्याने गुंता अधिक वाढू शकतो. जास्त विचार करणं वेळीच थांबवलं नाही तर ओव्हरथिंकिंग जास्त वाढू शकते.
ज्या गोष्टीवर केवळ काही तासाभरात निर्णय घेणं शक्य आहे अशा विषयावर जर तुम्ही एक आठवड्याहून जास्त विचार करत राहिलात तर तुम्ही तुमचा एक आठवडा फुकट घालवत आहात. यासाठी स्वत:साठी एक डेडलाइन म्हणजेच वेळ मर्यादा ठरवा. जेणेकरून तुम्ही वेळेत योग्य निर्णय घेऊन इतर वेळी महत्वाच्या कामांना देऊ शकाल.
निर्णय घेण्याने देखील येतो थकवा
प्रत्येक व्यक्ती दिवसभरामध्ये अनेक लहान मोठे निर्णय घेत असते. अगदी स्वयंपाकात Kitchen काय बनवायचं ते ईमेलला E-Mail काय उत्तर द्यायचं किंवा कोणते कपडे घालायचे आणि सुट्टीच्या दिवशी काय करायचं असे अनेक निर्णय आपण घेत असतो.
दिवसभरातील या निर्णयांमुळे मानसिक थकवा येतो. अनेकदा हा थकवा आपल्याला जाणवतही नाही. यासाठीच आपल्या मेंदूची ताकद काही शुल्लक निर्णय घेण्यासाठी वाया घालण्यासाठी अशा निर्णयांसाठी फार विचार करू नका.
दिवसभरासाठी योग्य रुटीन तयार करा आणि ते फॉलो करा. यामुळे काही छोटे छोटे निर्णय घेणं सोप होईल. अशा प्रकारे तुमचा रोजचा दिवस सुरळीत जावा. तुमच्या ऑफिसच्या कामांसोबत तुमच्या घरातील कामं करताना तुम्हाला कमी वेळेत योग्य निर्णय घेण्यासाठी या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.