लाइफस्टाइल

Fact Check : सरकारी रुग्णालयातील मास्क वापरल्यामुळे नागरिक होतायेत बेशुद्ध?

शर्वरी जोशी

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही वाढती रुग्णसंख्या पाहून प्रशासनदेखील सतर्क झालं असून वेळोवेळी नागरिकांमध्ये जनजागृतीचं काम करत आहे. तर, दुसरीकडे मात्र सोशल मीडियावर काही अफवादेखील पसरत आहेत. याच अफवांमुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक नवीनच चर्चा रंगली आहे. त्यानुसार, सरकारी रुग्णालयात मोफत वाटण्यात येणारे मास्क वापरल्यानंतर व्यक्ती बेशुद्ध होतो, असं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही माहिती देणारा एक ऑडिओ क्लीप सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र, प्रत्यक्षात ही माहिती चुकीची असून प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने ( PIB) याविषयीची खरी माहिती समोर आणली आहे.

सध्या व्हॉट्स अॅपवर एक माहिती वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे. या माहितीनुसार, सरकारी रुग्णालयात मोफत मिळणारे मास्क वापरल्यानंतर व्यक्ती बेशुद्ध होतो आणि त्यानंतर त्याला कोव्हिड वॉर्डमध्ये ठेवण्यात येतं. मात्र, ही माहिती चुकीची असून याविषयी खोटी अफवा पसरवण्यात येत असल्याचं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्पष्ट केलं आहे. पीआयबीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

PIB  फॅक्ट चेक -

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली माहिती खोटी असून त्यात काहीही तथ्य नाही. सरकारी रुग्णालयातील मास्क वापरल्यामुळे कोणताही अपाय होत नाही. त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं पीआयबीने सांगितलं आहे.

कोणत्याही बातमीची सत्यता पडताळल्याशिवाय तिच्यावर विश्वास ठेऊ नका आणि ते शेअरदेखील करु नका. कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळू पाहा आणि अफवा पसरवणाऱ्यांपासून सावध रहा, असं ट्विट पीआयबीने केलं आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Marathi News Live Updates : आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT