लाइफस्टाइल

पैशांची बचत करा स्मार्टली; महिलांसाठी आर्थिक नियोजनाच्या खास टीप्स

सकाळ डिजिटल टीम

गायत्री जगदाळे

आजच्या जगात महिलांना आर्थिक नियोजनाबद्दल सर्व काही समजणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजनातील नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी समजल्या पाहिजेत, ते आज पाहूया.

१) उत्पन्नाचा स्रोत- आपण काम करीत असल्यास आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत समजून घ्या; तसेच आपल्या जोडीदाराच्याही उत्पन्नाचा स्रोत समजून घ्या. आपल्याकडे पगार किंवा व्यवसायाचे उत्पन्न, लाभांश, घरभाडे, मुदत ठेवीचे व्याज आदी कोणत्या मार्गाने पैसे येत आहेत, हे माहिती करून घ्यावे.

२) बचत- महिला सर्वसामान्यत: पैशाची बचत करतात. त्यामुळे ही बचत नेमकी कशी करावी याच्या काही खास टीप्स पाहुयात.

अ) बचत केव्हा कराल - महिन्याच्या सुरुवातीस, कारण खर्च करण्यापूर्वी बचत करणे नेहमीच चांगले असते.

ब) बचत कशी कराल - पैशांची बचत करण्यासाठी चैनीच्या वस्तू, हॉटेलिंग आदींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. परंतु, याचा अर्थ गुणवत्तेशी तडजोड करणे असे नाही. चांगले अन्नधान्य, फळे, भाजीपाला यांच्या बाबतीत तडजोड करू नका.

क) कसे - जेथे तातडीने खर्च करणे आवश्यक नाही, तेथे खर्च पुढे ढकला. अनावश्यक खर्च टाळा. अर्थसंकल्पामुळे अधिक बचत होऊ शकते.

३) गुंतवणुकीची मूलतत्त्वे - गुंतवणुकीची मूलतत्त्वे माहिती असणे आवश्यक आहे. आपत्कालीन निधी, आरोग्य विमा आणि मुदत विमा काढणे गरजेचे असते.

४) गुंतवणूक - महिलांना मुदत ठेव, शेअर्स, म्युच्युअल फंड, गोल्ड ईटीएफ, पेन्शन योजना आदी वेगवेगळ्या पर्यायांबद्दल माहिती असली पाहिजे.

५) कर -आर्थिक नियोजनात कर हा एक महत्त्वाचा घटक आहे. उत्पन्न, गुंतवणूक, घर आदींशी संबंधित वेगवेगळ्या करांची माहिती महिलांनी जाणून घ्यावी. त्यामुळे योग्य निर्णय घेण्यास मदत होते.

हे सर्व अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी आपण अनुभवी आर्थिक सल्लागाराची मदत देखील घेऊ शकता.

आपल्या घरात पैशाबद्दल आणि गुंतवणुकीबद्दल चर्चा करा. एक महिला म्हणून आपण स्वतंत्र आहात आणि म्हणूनच आर्थिकदृष्ट्यादेखील नेहमी स्वतंत्र राहा.

(लेखिका ‘फंड-मॅटर्स’च्या संस्थापिका आहेत.)

संपादन : शर्वरी जोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT