Vehicle Repairing Sakal
लाइफस्टाइल

झूम : वाहन दुरुस्ती घरच्या घरी...

वाहने चालवण्यात अनेकजण निष्णात असले, तरी वाहनांची प्राथमिक दुरुस्ती कशी करावी याचे कौशल्य त्यांच्याकडे नसते.

प्रणीत पवार

वाहने चालवण्यात अनेकजण निष्णात असले, तरी वाहनांची प्राथमिक दुरुस्ती कशी करावी याचे कौशल्य त्यांच्याकडे नसते. वाहन म्हणजे यंत्रच, त्यात बिघाड उद्‌भवणारच. त्यामुळे एखाद्या लांबच्या किंवा अतिदुर्गम भागात, घाट रस्त्यांवर वाहनांमध्ये बिघाड उद्‌भवल्यास अशा वाहन चालकांची मोठी अडचण होते. दुचाकी किंवा चारचाकींमध्ये काही प्राथमिक बिघाड असतात, जे आपण स्वतः दुरुस्त करू शकतो. याच पार्श्वभूमीवर वाहनांच्या प्राथमिक दुरुस्तीचा आढावा.

इंजिन ऑइल

कारचे इंजिन ऑइल हे मानवी शरीरात हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्ताप्रमाणेच कार्य बजावते. इंजिन ऑइल वेळेत न बदलल्यास वंगण (ल्युब्रिकंट) क्षमता कमी होते. ते कसे बदलावे, हे प्रत्येकाने जाणून घेणे गरजेचे आहे. ऑइल बदलणे ही एक सोपी प्रक्रिया असून, त्यासाठी ऑइल फिल्टर आणि ऑइलचा निचरा (ड्रेन) करणारा प्लग काढावा लागतो. त्यातून सर्व ऑइल इंजिनच्या बाहेर येते. त्यानंतर नवीन ऑइल फिल्टर आणि ड्रेन प्लग पुन्हा बसवून ऑइल कारमध्ये भरता येते.

स्पार्क प्लग

स्पार्क प्लग हा इंजिनमधील दहन प्रक्रिया सुरू करतो. स्पार्क प्लगमध्ये तीन स्तर असतात. बाहेरील स्तरावर थ्रे़ड असलेले धातूचे कवच असते, जे प्लगला संरचनात्मक ताकद देते. या कवचाला लागूनच एका बाजूला इलेक्ट्रोड असतो, ज्याला धातूचे आवरण असते. या धातू कवचाच्या आतमध्ये पोर्सेलीन (porcelain) स्तर असतो, जो आतमधील मेन इलेक्ट्रोडला उष्णता पुरवतो. त्यातून पुढे विद्युत पुरवठा होतो. हा स्पार्क प्लग बदलण्यासाठी त्याची वायर काढावी लागते. एखादवेळी प्लगच्या पुढील भागाला पॉलिश करूनही तो प्लग पुन्हा लावता येतो. अन्यथा नवीन प्लग लावून वाहन पूर्ववत करता येते.

बॅटरी तपासणे

कारची बॅटरी तीन ते चार वर्षे टिकते. खराब बॅटरीमुळे वाहनातील विविध सुविधांवर परिणाम होतो. आताच्या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स समाविष्ट असतात. अशावेळी बॅटरी चांगल्या स्थितीत असणे आवश्यक आहे. कारची खराब झालेली बॅटरी बदलणे अत्यंत सोपी गोष्ट आहे. बॅटरीचे कव्हर काढून त्यांच्या जोडण्या काढून टाकाव्यात. या पॉझिटिव्ह-निगेटिव्ह जोडण्या एकमेकांपासून दूर ठेवाव्यात. त्यानंतर बॅटरीला जोडलेले सर्व स्क्रू काढून जुन्या बॅटरीच्या जागी नवीन बॅटरी बसवावी. त्यानंतर सर्व जोडण्या व्यवस्थित कराव्यात. हे करण्यापूर्वी आधीच्या जोडण्या लक्षात ठेवणे गरजेचे आहेत.

एअर फिल्टर

एअर फिल्टर ऑइल फिल्टरप्रमाणेच कारसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. ते अगदी स्वस्त असून, घरच्या घरीही बदलता येऊ शकतात. कारचे बोनेट उघडल्यानंतर एअर फिल्टरच्या हाऊजिंगचा शोध घेऊन त्याचे कव्हर काढावे. त्यातून हा स्पंजसारखा फिल्टर बाहेर काढावा. हाऊजिंग स्वच्छ करून, नवीन एअर फिल्टर त्यात बसवावा आणि पुन्हा लावण्याची प्रक्रिया करावी. कार प्रतिकिलोमीटर मायलेज कमी देत असल्यास फिल्टर बदलणे आवश्यक असते. त्यासाठी कार कंपनीने निर्देशित केलेला कालावधी पाळावा.

ब्रेक पॅड्स

वाहनांसाठी ब्रेक हा इंजिनप्रमाणेच महत्त्वाचा घटक आहे. ब्रेक हे वाहनासोबतच रस्त्यावरून चालणारे पादचारी, इतर वाहनांची सुरक्षाही निश्चित करते. म्हणूनच कारसाठी सक्षम ब्रेकिंग यंत्रणेची खात्री करावी. या ब्रेकला पुढे पॅड लावलेले असतात जे चांगल्या स्थितीत आहेत की नाही, हे तपासावे. त्यांची अतिप्रमाणात झिज झाली असल्यास ते घरीच बदलता येतात. चाकाचे नट सैल करून कारला जॅक लावून, चाक काढावे लागते. चाकाच्या स्लाईडरला लागलेले ब्रेक पॅड काढून नवीन पॅड स्प्रिंगच्या साह्याने जोडावेत. त्यानंतर पुन्हा चाक कारला लावावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati OBC Politics: ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके बारामती पोटनिवडणुकीत उतरले; सुनेत्रा पवारांना थेट आव्हान

Mumbai News: प्राण्यांसाठी विशेष ‘कूलिंग’ व्यवस्था, राणी बागेत वाढत्या उष्णतेचा तडाखा; प्रशासन सतर्क

'अश्लिल साइटवर माझा फोटो पाहिला आणि...' 15 व्या वर्षीच जान्हवी कपूरला आलेला वाईट अनुभव, म्हणाली...'एका दुसऱ्याच शरीराला...'

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT