Hydrogen Fuel
Hydrogen Fuel Sakal
लाइफस्टाइल

झूम : हायड्रोजन इंधनातून भविष्याचा वेध

प्रणीत पवार

पेट्रोल-डिझेलचा कधीही उडणारा भडका, परिणामी वाढणारा प्रवास खर्च, त्यामुळे कोलमडणारे बजेट, शिवाय वाढते प्रदूषण यामुळे कारप्रेमी पर्यावरण पूरक आणि शाश्वत इंधन पर्यायांकडे वळले आहेत.

पेट्रोल-डिझेलचा कधीही उडणारा भडका, परिणामी वाढणारा प्रवास खर्च, त्यामुळे कोलमडणारे बजेट, शिवाय वाढते प्रदूषण यामुळे कारप्रेमी पर्यावरण पूरक आणि शाश्वत इंधन पर्यायांकडे वळले आहेत. त्यात सीएनजी, एलपीजीनंतर इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय असताना आता हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या कारची चर्चा होत आहेत. हायड्रोजन इंधन नेमके आहे तरी काय, याबाबत सविस्तर...

जपानची वाहन निर्माता कंपनी टोयोटाने हायड्रोजनवर धावणारी कार निर्माण केली आहे. कारमध्ये एकदाच पूर्ण क्षमतेने (५.५६ किलो) हायड्रोजन भरल्यानंतर ही कार १ हजार ३०० किलोमीटर धावली. यात कार्बनचे शून्य उत्सर्जन झाले. युरोपमध्ये हायड्रोजनवर रेल्वे चालविण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. याच धर्तीवर भारतातही हायड्रोजन कारची चाचपणी होत आहे. बुधवारी (१६ मार्च) दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हायड्रोजनवर धावणारी भारतातील पहिली कार चालवली.

इलेक्ट्रिक वाहनांतून शून्य उत्सर्जन होणार असले. तरी वीजनिर्मितीसाठी पारंपरिक स्रोतांचा वापर होतो. त्यामुळे ही वाहने पूर्णपणे पर्यावरण पूरक म्हणू शकत नाहीत आणि म्हणूनच हायड्रोजन इंधनाचा पर्याय समोर येत आहे. वास्तविक एखादे रॉकेट अंतराळात पाठवण्यासाठी हायड्रोजन इंधनाचा वापर होतो. परंतु, काही वाहनांमध्येही त्याचा वापर होतो. भविष्यात हे इंधन ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती घडवेल, याची शक्यता नाकारता येत नाही.

असे तयार होते हायड्रोजन?

जीवाश्म इंधनाप्रमाणे हायड्रोजन सहसा नैसर्गिक साठ्यामध्ये आढळत नाही. नैसर्गिक वायू किंवा बायोमास किंवा पाण्याच्या विद्युत विघटनाने हायड्रोजन तयार केले जाते. हायड्रोजन इंधनाचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे हरितगृह वायू उत्सर्जन कमी करते. विशेषत: पाण्याचे हायड्रोजनमध्ये रूपांतर करण्यासाठी अक्षय वीज वापरून गॅसची निर्मिती केली जाते. हायड्रोजन इंधनामध्ये हायड्रोजन व हायड्रोजन संयुगांचा वापर करून ऊर्जानिर्मिती होते. या इंधनापासून पर्यावरणविषयक व सामाजिक फायदे मोठ्या प्रमाणावर मिळतात.

इंधन म्हणून वापर का शक्य?

१) सध्याच्या काळात हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर होऊ शकतो. याबाबत संशोधन केल्यानंतर हायड्रोजनद्वारे ऊर्जेचा वापर करून सेल निर्मिती करणे, वाहनांमध्ये वापर करणे शक्य होणार आहे. हायड्रोजन इंधनाचा वापर करून केवळ पाणी बाहेर येते. या उलट पेट्रोल-डिझेल वाहनांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते.

२) वातावरणातील कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी हायड्रोजन हाच पर्यावरणीयदृष्ट्या फायदेशीर पर्याय आहे. हायड्रोजन इंधनाचे जेवढे फायदे आहेत तेवढीच आव्हानेही आहेत. यातील सर्वांत मोठे आव्हान, त्याचे उत्पादन खूप महाग आहे. हे प्रामुख्याने उत्प्रेरक किंवा उत्प्रेरकांसाठी आवश्यक असलेल्या प्लॅटिनमसारख्या दुर्मिळ सामग्रीच्या आहे.

आव्हान काय?

१) वाहनातील पेट्रोल टाकीच्या तुलनेत संकुचित स्वरूपात असलेल्या हायड्रोजन गॅस सिलिंडरचे वजन अधिक असते. हायड्रोजन वायूला द्रव अवस्थेत थंड करण्यासाठी, तापमान २० केल्विनने खाली आणणे आवश्यक आहे. हायड्रोजन इंधन पूर्ण कार्यक्षम पद्धतीने वापरण्यात हा मोठा अडथळा आहे. म्हणूनच, भविष्यात हायड्रोजन इंधन म्हणून वापर सोप्या पद्धतीने कसा करायचा, यावर मार्ग शोधण्याचे प्रयत्न जगभरातील तज्ज्ञांकडून सुरू आहेत.

२) जगभरात हायड्रोजन वाहनांसाठी फिलिंग स्टेशन्स अत्यंत कमी संख्येने आहेत. भारतात ही वाहने अद्याप यायची आहेत. हायड्रोजन इंधन पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत महाग ठरणार असले, तरी ते पर्यावरणाला नुकसानकारक ठरणार नाही. हायड्रोजन गॅस अत्यंत ज्वलनशील असतो. हायड्रोजन टँक पूर्ण क्षमतेने भरला जातो, तेव्हा वाहन चालवताना दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यासाठी टँक अधिक मजबुतीने बनवली जातात व त्यामुळे किंमत वाढते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT