jimny fronx cars
jimny fronx cars sakal
लाइफस्टाइल

झूम : बदलत्या ट्रेंडची दखल

प्रणीत पवार

गेल्या दशकभरात भारतात कार खरेदी करण्याच्या ट्रेंडमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला. तो म्हणजे हॅचबॅक, सेदान श्रेणीतील कारपेक्षा एसयूव्ही श्रेणीकडे ग्राहक मोठ्या संख्येने वळत आहेत.

मारुती- सुझुकीने ‘काळाची पावले ओळखत’ बदलांच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. नुकताच झालेल्या ऑटो एक्स्पोमध्येही याची झलक पहायला मिळाली.

गेल्या दशकभरात भारतात कार खरेदी करण्याच्या ट्रेंडमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला. तो म्हणजे हॅचबॅक, सेदान श्रेणीतील कारपेक्षा एसयूव्ही श्रेणीकडे ग्राहक मोठ्या संख्येने वळत आहेत. एसयूव्ही कार्सनी दरम्यानच्या काळात त्यांची वैशिष्ट्ये आणि उपयुक्ततेमुळे चांगली लोकप्रियताही मिळवली. रस्त्यावरील चांगली पकड, उच्च दृश्यमानता आणि फिचर्स आदी कारणांमुळे या कार भारतातील रस्त्यांच्या परिस्थितीनुसार उपयोगी ठरू लागल्या आहेत. म्हणूनच एसयूव्ही आता पूर्वीपेक्षा परवडणाऱ्या आणि सुलभ करण्याकडे प्रत्येक कंपन्यांचा कल असतो.

मारुती सुझुकीच्या विक्री आणि विपणन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव सांगतात, की ग्राहकांच्या बदललेला ट्रेंड दरवर्षी कारविक्रीच्या आकड्यातून पाहायला मिळतो. परिणामी प्रवासी वाहन विभागाच्या एकूण विक्रीत एसयूव्ही श्रेणीचा वाटा ४२ टक्के आहे; तरीही येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे कोरोनानंतरच्या काळात वैयक्तिक कार खरेदी वाढली, त्यात हॅचबॅक श्रेणीतील कार खरेदीला अधिक प्राधान्य दिले जात आहे.

हॅचबॅक श्रेणीत मारुती सुझुकीचा वाटा ९० टक्के आहे; तर सरासरी कार विक्रीत हाच वाटा ७२ टक्के आहे. सध्या ट्रेंड बदलत असल्याने आम्हीही एसयूव्ही श्रेणीत पर्याय देत आहोत. हॅचबॅक श्रेणीप्रमाणे एसयूव्ही श्रेणीतही २०२४ पर्यंत अव्वल स्थानी येण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

एसयूव्हींच्या वाढत्या मागणीमुळे मारुती सुझुकीने २०१६ मध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीतील ‘ब्रीझ्झा’ ही कार बाजारात आणून पहिले पाऊल टाकले. या कारने भारतीय ग्राहकांमध्ये चांगली लोकप्रियता मिळवली. त्यामुळे या कारचा बाजारात विक्रीतील सरासरी वाटा १५.८ टक्के राहिला आहे.

त्यानंतर मध्यम आकाराच्या एसयूव्ही श्रेणीत ‘ग्रँड व्हिटारा’ बाजारात आणून मारुती सुझुकीने आधुनिक तंत्रज्ञान आणि परिपूर्ण फिचर्सचे पॅकेज ग्राहकांना दिले; परंतु कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीत ब्रीझ्झाला ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद मारुती सुझुकीसाठीही टर्निंग पाईंट ठरला.

२०२२ मध्ये मारुती सुझुकीने ब्रीझ्झा पुन्हा नव्या रूपात सीएनजी इंधन पर्यायासह बाजारात दाखल केली आहे. एकूणच प्रत्येक श्रेणीला मिळणारा प्रतिसाद, अन्य कंपन्यांशी असलेली स्पर्धा पाहून मारुती सुझुकीनेही ग्राहकांसाठी आधुनिक धाटणीच्या कार बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे.

जिम्नी, फ्रॉन्क्सची उत्सुकता

जानेवारी महिन्यात नोएडा येथे झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये मारुती सुझुकीने फ्लेक्स फ्युएल इंधनावर आधारित व्हॅगनार, ब्रीझ्झा एससीएनजी, इंटिलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रीड तंत्रज्ञान असलेल्या ग्रँड व्हीटारासह, ईव्हीएक्स ही इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार सादर केली. शिवाय जिम्नी आणि फ्रॉन्क्स या कारचे दर्शनही घडवले. सध्यातरी जिम्नी आणि फ्रॉन्क्स या एसयूव्ही श्रेणीतील कारबद्दल ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या दोन्ही कारच्या डिलिव्हरींना अद्याप सुरुवात झालेली नाही. तरीही जिम्नीला महिनाभरात सरासरी २० हजार; तर फ्रॉन्क्सला १० हजार बुकिंग मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT