Pregnant Woman shows Unique Baby Bump 
लाइफस्टाइल

''OMG! काय बाई आहे''; महिलेचे Baby Bump पाहून व्हाल अचंबित!

सकाळ डिजिटल टीम

आई आणि बाळाचे नातं जगातील सर्वात अमोल नाते आहे. प्रत्येक आई ९ महिने बाळाला गर्भामध्ये वाढवते आणि प्रंचड त्रास देखील सहन करते. सध्या सोशल मिडियावर एका आईचे कौतूक होत आहे. या महिलेने आपल्या बेबी बंपचा (baby bump) फोटो टाकला आहे . हा फोटोज पाहून नेटकरी आश्चर्यचकित होत आहेत. काही जणांनी तिच्या फोटोवर कॉमेंट करू तिचे कौतुक केले आहे तर काही जणांनी तिचे बेबी बंप एवढे मोठे कसे आणि तिला किती त्रास झाला असेल असाही विचार करत आहे. (Pregnant Woman shows Unique Baby Bump)

कोण आहे ही महिला?

सोशल मिडियावर ज्या महिलेचे एवढे कौतूक केले जात आहे त्या महिलेचे नाव मिशेला मेअर्स मोर्सी (Michella Meier-Morsi)आहे. त्यांनी सोशल मिडियावर प्रेग्नेंसीच्या काळामध्ये बेबी बंपचे फोटोज आणि व्हिडिओ शेअर केले. त्यांनी प्रेग्नेंसीच्या काळात ३५ आठवडे मुलं गर्भामध्ये ठेवले आणि त्यानंतर ऑपरेशननंतर तिने ३ मुलांना जन्म दिला.

मिशेलाच्या ३ मुलांचे नाव चार्ल्स, थियोडोर आणि गेब्रियल आहे. त्यांना २ जुळ्या मुली देखील आहे. सोशल मिडीयावर जेव्हा प्रेग्नेंसीचा फोटो व्हिडिओ आणि स्टोरी शेअर केली तेव्हा त्यांचे फॉलोअर्स सतत वाढत गेले. साधारण २.६७ फॉलोवर्स झाले आहे. काही दिवासांपूर्वी मिशेलाने आपल्या मुलांना जन्म देण्यासाठी फोटो शेअर केली ज्यामध्ये त्यांच्या पोटाची त्वचा खूप ओढलेली दिसत आहे.

बेबी बंपने वेधले लक्ष

मिशेलाने जसे आपले बेबी बंपचे फोटो शेअर केले, तेव्हा लोकांचे लक्ष त्यांच्या पोटावर गेले कारण प्रेग्नेंसीच्याकाळात पोट वरच्या किंवा खालच्या दिशेने वाढते पण तिचे पोट समोरच्या बाजूला सरळ वाढल्याचे दिसत होते. मिशेलाने ऑपरेशनच्या एक दिवस आधीचा व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये ड्रेसिंग गाऊनमध्ये उभे राहून आपल्या बेबी बंपचा पकडले आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी सांगितले की त्यांना ३५ आठवडे झाले आहे.

त्यांनी ऑपरेशनच्या आधीचे ३६ तास खूप अवघड होते. पण या अवघड परिस्थितीचा सामना करत त्यांनी तीन मुलांना जन्म दिला. तिन्ही मुलं स्वस्थ आहेत. त्यांनी जो व्हिडिओ शेअर केला तो २.५ मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्यानंतर मिशेलाच्या या व्हिडिओमध्ये एक टिक-टॉकने शेअर केला आहे ज्यानंतर त्यांची जगभरातील लोकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले.

कोणी म्हणाले सुपरहिरो तर कोणी झाले आश्चर्यचिकित

या व्हिडिओमध्ये मिशेलाने कित्येक फोटोज् शेअर केले. त्यांच्या या व्हिडिओवर एका व्यक्तीने सांगितले की, ''ओ माई गॉड, काय बाई आहे'' तर दुसरा व्यक्ती म्हणला की,''मी निशब्द झालायो, तुम्ही माझ्या सुपरहिरो आहात.'' काही लोक म्हणाले हे फार विचित्र आहे. बेबी बंप वर-खालच्या दिशेन वाढते. पण हे तर समोरच्या दिशेन वाढत आहे. तर एक व्यक्ती म्हणला महिलेला पाठदुखी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT