चोरीपासून कारची सुरक्षा Esakal
लाइफस्टाइल

Car Theft होण्याची तुम्हाला देखील चिंता सतावतेय? मग या टिप्स नक्की वाचा

चोरांपासून कारचं रक्षण व्हावं यासाठी जर तुम्ही थोडे पैसे खर्च करण्याची तयारी ठेवलीत तर तुमची लाखो रुपयांची कार सुरक्षित राहू शकते. यासाठी तुम्हाला काही टूल्स खरेदी करावे लागू शकतात

Kirti Wadkar

कार खरेदी केल्यानंतर तिची काळजी घेणं देखील अत्यंत गरजेचं असतं. अनेकजण मोठ्या मेहनतीने आपल्या स्वप्नातली कार खरेदी Car Purchase करतात. मात्र त्यानंतर अनेकदा चिंता असते ती म्हणजे कार चोरी होण्याची. तुम्ही देखील आजवर अनेक कार चोरीच्या बातम्या ऐकल्या असतील. Protect your car from possible theft by using devices

अशा बातम्या वाचल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर चिंता अधिक वाढू लागते. खास करून एखाद्या पार्किंग एरियामधून Car Parking किंवा जर तुम्ही घरापासून दूर कार पार्क करत असाल तर कार चोरीची चिंता कायम सतावते. जर तुम्ही देखील सतत या चिंतेत असाल तर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुमची कार चोरीची Theft चिंता दूर होईल.

चोरांपासून कारचं रक्षण व्हावं यासाठी जर तुम्ही थोडे पैसे खर्च करण्याची तयारी ठेवलीत तर तुमची लाखो रुपयांची कार सुरक्षित राहू शकते. यासाठी तुम्हाला काही टूल्स खरेदी करावे लागू शकतात.

GPS ट्रॅकर- तुम्ही कारमध्ये GPS ट्रॅकर बसवू शकता. यामुळे तुम्हाला कारच्या लोकेशनची संपूर्ण माहिती मिळेल. अवघ्या काही हजारांमध्ये Car GPS तुम्हाला सहज उपलब्ध होईल.

मात्र हे डिव्हाइस बसवताना ते चोरांना सहजदिसणारं नाही अशा ठिकाणी बसवण्याची दक्षता घ्या. जेणे करून तुम्हाला किंवा पोलिसांच्या मदतीने चोरीला गेलेली कार शोधणं सोप होईल.

अँटी थेफ्ट सिस्टम- अनेक नव्या कारमध्ये हे फिचर देण्यात आलेलं असतं. मात्र ते अॅक्टिव्हेट करणं गरजेचं असतं. यामुळे जर कुणी तुमची कार चोरी करण्याचा प्रयत्न करत असेल. चावी शिवाय खिडकीची काच फोडून किंवा इतर मार्गाने गाडीचं दार उघडण्याचा प्रयत्न करत असेल तर एक सायरन वाजू लागतो.

त्यामुळे जर तुम्हाला कार चोरी होण्याची चिंता असेल तर अँटी थेप्ट सिस्टम अॅक्टिव्हेट करून घ्या. तसंच सेंट्रल लॉकिंग किंवा इंजन इम्मोबिलायजर सारखी सिस्टम तुम्ही कारमध्ये बसवू शकता.

हे देखिल वाचा-

विविध लॉक- कार चोरीचं संकट टाळण्यासाठी तुम्ही कारमध्ये गियर लॉक, स्टियरिंग लॉक, स्टेपनी लॉक किंवा इग्निशन लॉक सारखे डिव्हाइस बसवू शकता. हे डिव्हाइस अत्यंत कमी किमतीत सहज उपलब्ध होतात. तसचं ते सहज इंस्टॉल करता येतात.

कारमध्ये जर गियर आणि स्टियरिंग लॉक असेल तर कार सुरु करणं चोरांना अशक्य होतं. तसचं हे डिव्हाइस तोडण्यास किंवा ओपन करण्यास वेळ जात असल्याने चोर तुमची कार चोरण्याचा विचार सोडू शकतात.

सुरक्षित पार्किंग- तुम्ही कार कुठे पार्क करत आहात हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. कार पार्क करताना ती एखाद्या ऑथराइज्ड पार्किंगमध्ये पार्क करावी किंवा जिथे सीसीटीव्ही कॅमेरा किंवा वॉचमनची सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी कार पार्क करा.

कारमधून उतरल्यावर ही काळजी घ्या- कार पार्क करून जात असताना कार योग्य प्रकारे लॉक झाली आहे का? सर्व काचा पूर्णपणे बंद आहेत ना हे तपासा. अनेकदा Key लॉक सिस्टमुळे कार लॉक झाली की नाही याचा गोंधळ उडू शकतो यासाठी कारची दारं नीट तपासणं गरजेचं आहे.

चावी लावून बाहेर पडू नका- अनेकदा काहीजण एखाद्या दुकानातून एखादी वस्तू घेण्यासाठी तरता. यावेळी काही मिनिटात परतण्याच्या उद्देशाने कारला चावी तशीच सोडून जातात. मात्र ही चुक करणं महागात पडू शकतं. त्यामुळे कार लॉक करून चावी सोबत घेऊनच कायम कार बाहेर पडा.

याचसोबत जर तुम्ही जास्त दिवसांसाठी कार घराबाहेर किंवा पार्किंगमध्ये पार्क करून घराबाहेर जाणार असाल तर कारमधील महागडे स्टीरिओ किंवा इतर महागड्या वस्तू काढून ठेवा. शक्य झाल्यास कार कव्हर टाकून कार पार्क करा.

अशा प्रकारे काही गोष्टींची खबरदारी घेतल्यास तुमची कार चोरीला जाण्याची चिंता कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

तिला स्मशानात जळायचं नव्हतं... आईच्या गूढ मृत्यूबद्दल पहिल्यांदाच बोलली पूजा बेदी; म्हणाली, 'ती अचानक गायब झाली...

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT