Pune Porsche Crash : Sakal
लाइफस्टाइल

Pune Porsche Crash : बाल सुधारगृहात कसा असतो दिनक्रम? विशाल अग्रवालच्या आरोपी मुलाची १४ दिवस झाली रवानगी

Pune Porsche Crash : बाल सुधारगृहात अल्पवयीन आरोपीचा दिनक्रम कसा असेल हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Pune Porsche Crash : कल्याणीनगरमध्ये दुचाकीला धडक देऊन दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करून त्याला १४ दिवस बाल सुधारगृहात ठेवण्याचा निर्णय बाल न्याय हक्क मंडळाने दिला आहे. बाल सुधारगृहात अल्पवयीन आरोपीचा दिनक्रम कसा असेल हे जाणून घेऊया.

बाल सुधारगृहात अल्पवयीन आरोपीचा दिनक्रम

सकाळी ८:१० वाजता

नाश्त्यासाठी पोहे, अंडी,दूध, उपमा देण्यात येणार आहे.

११ वाजता

प्रार्थनेची वेळ असणार आहे.

११: ३० ते दुपारी १ वाजता

यानंतर इंग्रजीसह इतर विषयांच्या शिकवण्या असणार आहे.

१ ते १:३० वाजता

दुपारच्या जेवणाची वेळ असणार आहे.

१: ३० ते दुपारी ४ वा

डॉर्मेटरीमध्ये आराम करता येणार आहे.

४ वाजता

दुपारचा नाश्ता दिला जाणार आहे.

४: ३० ते सायंकाळी ५ वाजता

टीव्ही पाण्यासाठी वेळ दिला जाणार आहे.

५ ते संध्याकाळी ७

फुटबॉल आणि व्हॉलीबॉल खेळण्यासाठी सुट्टी असणार आहे.

रात्री ७ ते ८ वाजता

रात्रीच्या जेवणासाठी पालेभाज्या, चपाती, वरण-भात दिला जाणार आहे.

८ वाजता

झोपण्याची वेळ असणार आहे.

दरम्यान वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उठली आहे. वेगवान आलिशान कारची धडक बसल्याने दुचाकीवरील दोघांचा कल्याणीनगर येथे जागीच मृत्यू झाला.

आरोपी मुलाकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही, हे माहिती असूनही त्याच्या ताब्यात कार दिल्याच्या आरोपावरून वडील विशाल अग्रवाल यांना अटक झाली आहे. न्यायालयाने त्याला २४ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

या प्रकरणात ‘कोझी’ आणि ‘ब्लॅक’ हॉटेलचे मालक, तेथील दोन व्यवस्थापकांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाबरोबर कारमध्ये असलेल्या त्याच्या दोन मित्रांवर आणि चालक म्हणून नोकरी करणाऱ्यावर पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT