Radhika Merchant esakal
लाइफस्टाइल

Radhika Merchant : अंबानींच्या डिनर पार्टीत राधिका मर्चंटच्या पटोला सूटने वेधले लक्ष, सोज्वळ लूक होतोय व्हायरल.!

Radhika Merchant : राधिका-अनंत १२ जुलैला मुंबईत लग्नबंधनात अडकणार आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Radhika Merchant : भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिका काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले. राधिका-अनंत १२ जुलैला मुंबईत लग्नबंधनात अडकणार असून सध्या त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.

राधिका-अनंतच्या लग्नापूर्वी अंबानी कुटुंबाने त्यांच्या अलिशान 'अँटिलिया' या घरी नुकतेच एका डिनर पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीतील राधिका मर्चंटची झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पार्टीला अंबानींची भावी सून राधिकाने तिच्या साध्या अन् सोज्वळ लूकने सर्वांची मने जिंकली आहेत. तिने परिधान केलेला पटोला सूट आणि तिचा नेमका लूक कसा होता? चला तर मग जाणून घेऊयात.

राधिकाने परिधान केला जुना पटोला सूट

या डिनर पार्टीसाठी अंबानी कुटुंबाने काही मोजक्याच लोकांना निमंत्रित केले होते. या पार्टीला राधिका मर्चंटने हजेरी लावली होती. तिने मल्टीकलर पटोला अनारकली सूट परिधान केला होता. यावर तिने मॅचिंग पॅंट आणि सोबत सुंदर दुपट्टा कॅरी केला होता. या लूकमध्ये राधिका खूपच सुंदर अन् सोज्वळ दिसत होती. तिचा हा सिंपल लूक अनेकांना आवडला.

Radhika Merchant

परंतु, राधिकाने डिनर पार्टीला घातलेला हा ड्रेस यापूर्वी ही परिधान केला होता. १२ मार्च २०२४ रोजी अनंतची आजी कोकिलाबेन अंबानी यांच्यासोबत चोरवाडला गेली होती, त्यावेळी राधिकाने हाच पटोला सूट परिधान केला होता. या लूकमध्ये राधिका खूपच सुंदर आणि सोज्वळ दिसतेय. तिच्या या साधेपणाची सर्वत्र चर्चा होत आहे. राधिकाने पहिल्यांदाच हा ड्रेस रिपीट केला नाहीये. यापूर्वी ही तिने अनेकदा तिचे कपडे रिपीट केले आहेत.

अनंत-राधिकाचा लग्नसोहळा कुठे पार पडणार?

राधिका मर्चंट १२ जुलै २०२४ रोजी अनंत अंबानीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्हवेन्शन सेंटरमध्ये त्यांचा हा ३ दिवस चालणारा लग्नसोहळा पार पडणार आहे.

१२ जुलैला शुभविवाह होणार असून १३ जुलैला आशिर्वाद सोहळा तर १४ जुलैला भव्य स्वागत समारंभ पार पडणार आहे. अशा पद्धतीने ३ दिवस हा विवाहसोहळा रंगणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT