Raksha Bandhan Special Recipe Sakal
लाइफस्टाइल

Raksha Bandhan Special Recipe: राखी पौर्णिमेला बनवा नारळापासून 'हे' ३ स्पेशल पदार्थ, जाणून घ्या रेसिपी

Raksha Bandhan Special Recipe: हा दिवस नारळी पौर्णिमा म्हणूनही साजरा होतो. त्यामुळे या दिवशी शक्यतो नारळाचे पदार्थ किंवा तांदळाची खीर बनवण्याची पद्धत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Raksha Bandhan Special Recipe: हल्ली बाजारात हवे तितके गोड पदार्थ मिळतात. त्यापेक्षा आपण घरीच गोड पदार्थांचा बेत केला तर. राखीपौर्णिमेला आपल्या लाडक्या भावासाठी आपणच काही बनवले तर. हा दिवस नारळी पौर्णिमा म्हणूनही साजरा होतो. त्यामुळे या दिवशी शक्यतो नारळाचे पदार्थ किंवा तांदळाची खीर बनवण्याची पद्धत आहे. जवळपास सर्व समाजात थोड्याफार फरकाने हे पदार्थ बनवले जातात. राखीपौर्णिमेच्या या निवडक रेसिपी खास तुमच्यासाठी.

kheer

नारळाची खीर

साहित्य

ओल्या नारळाचे दुध, तांदूळ, तूप, साखर, सुकामेवा, वेलची पूड.

कृती

अर्धी वाटी तांदूळ आदल्या रात्री भिजत घाला. दुस-या दिवशी पाणी उपसून थोड्या तुपावर परतून घ्या. नंतर मिक्सरमधसून रवाळ मिश्रण काढा. (हीच कृती तांदूळ परतूनही मग भिजत घालायचे अशीही करु शकता.) ओले नारळ खोवून घ्या. एका खोल पातेल्यावर मलमलचा कपडा धरा. या कपड्यात खोवलेल्या नारळाचा कीस टाका व कापड गुंडाळून चांगले पिळा. दुध भांड्यात पडेल व कापडात नारळाचा चव राहील. आता गॅसवर कढई तापत ठेवा. पाणी घालून उकळी येऊ द्या. यामध्ये तांदूळाचे मिश्रण टाका. गाठोळ्या न व्हाव्यात म्हणून सारखे ढवळत रहा. यामध्ये साखर व नारळाचे दूध टाका. मग वेलची पूड व सुकामेवा घाला. गरज भासल्यास नारळाचा चव घाला. नारळाची खीर तयार.

rice

नारळी भात

साहित्य

तांदूळ १ वाटी, २- ३ लवंग, साखर १ वाटी, नारळाचा चव १ वाटी, दालचिनीचा तुकडा, केशर, तूप, काजू, किसमिस

कृती

भात मोकळा शिजवून घ्या. साखरेचा पक्‍का पाक करून घ्या व पाकातच केशर घाला. आता तुपाची फोडणी करा व त्यात लवंग, दा‌लचिनी, नारळाचा चव व भात घाला. नंतर काजू, किसमिस व साखरेचा पाक घालून मिश्रण हलक्‍या हाताने फिरवा. नारळी भात तयार.

Karanji

ओल्या नारळाच्या करंज्या

साहित्य

ओले नारळ १, साखर १ वाटी, रवा २ वाटी, मैदा पाव वाटी, दूध, वेलची पूड, जायफळ पूड दोन्ही मिळून अर्धा चमचा, केशर गरजेनुसार, सुकामेवा

कृती

नारळ खोवून घ्या. कीस थोडा पिळून त्यात साखर, केशर, बारीक केलेला सुकामेवा, वेलची व जायफळ पावडर घालून सारण तयार करा. रवा व मैदा एकत्र करा व तुपाचे मोहन घालून दुधाने गोळा मळून घ्या. चांगला अर्धा-पाऊण तास गोळा ‌तसाच झाकून ठेवा. आता रव्या-मैद्याच्या पारीमध्ये सारण भरून करंज्या तयार करा. तुपात खमंग तळून घ्या. सर्व्ह करताना करंजीवर दुधात भिजवलेले केशर घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT