Ram Navami 2024:
Ram Navami 2024: Sakal
लाइफस्टाइल

Ram Navami 2024: प्रभू रामाचे प्राचीन मंदिर हर्सूलमध्ये

सकाळ वृत्तसेवा

माधव इतबारे

Ram Navami 2024 rama hindu temple harsul india

हर्सूल गावात प्राचीन राममंदिर आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे हे मंदिर असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. हर्सूल गावात राजा विक्रमादित्याने हरसिद्धी देवीचे मंदिर बांधले. या मंदिराच्या समोरच राममंदिर आहे. ते किती प्राचीन आहे याची कोठे नोंद नाही. परंतु, राजा विक्रमादित्यानेच हे मंदिर बांधले असल्याचे येथील नागरिक सांगतात.

हर्सूल येथील हरसिद्धी देवीच्या मंदिरासमोर एक मोठे पाण्याचे कुंड असून, त्याच्या पलीकडे हे राम मंदिर पाहण्यास मिळते. मंदिरासमोर असलेले दोन खांब हेच प्रवेशद्वार आहे. त्यानंतर मोकळी जागा व भिंतीला लागून, असलेले देवालय भाविकांचे लक्ष वेधून घेते.

देवालयात राम, लक्ष्मण, सीतामाई व रामभक्त हनुमान यांच्या मूर्ती पाहण्यास मिळतात. येथे श्रीराम व सीता एका ओट्यावर उभे आहेत, तर खाली एका बाजूला लक्ष्मण तर दुसऱ्या बाजूला मारुतीराय पाहण्यास मिळतात. श्रीरामच्या मागील बाजूला त्यांचे धनुष्य आहे. रामाच्या मूर्तीवर छत्री असून, सीता बाजूलाच दोन्ही हात समोर असलेल्या अवस्थेत उभी आहे.

लक्ष्मणाच्या हातीसुद्धा धनुष्य असून, मारुती रामाच्या चरणी लीन झालेले दिसतात. मूर्ती खूपच पुरातन असल्यामुळे त्यावरील नक्षीकाम व बारकावे लक्षात येत नाहीत. विश्‍वस्त शरद हर्सूलकर यांनी सांगितले की, एका शिळेमध्ये या सर्व मूर्ती असून, हा परिसर राम दरबार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी भाविक मोठ्या भक्तिभावाने राम जन्मोत्सव साजरा करतात. महिला एकत्र येऊन पाळणा घालतात. त्यानंतर पूर्जा-अर्चा आरती, असे कार्यक्रम होतात. हे मंदिर किती जुने आहे, याची ठोस माहिती नाही, मात्र हरिसिद्धी माता मंदिरासोबतच हे मंदिर बांधलेले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT