Parenting Skills - Tips for Raising Teens esakal
लाइफस्टाइल

पालकांनो, तुमच्या अल्पवयीन मुलांना किती स्वातंत्र्य द्याल?

मुलांना त्यांच्या इच्छेनुसार आयुष्य जगण्यासाठी थोडेसे स्वातंत्र्य देण्याची गरज असते

सकाळ डिजिटल टीम

मुलांना तुम्ही पुरेसे स्वातंत्र्य दिले तर त्यांना तर त्यांना स्वतंत्र्य होण्यास आणि योग्य-अयोग्य यामधील फरक ओळखण्यास मदत होते. पण त्याचबरोबर मुलांवर तुम्ही पालक म्हणून कोणतेही चुकीचे निर्णय घेण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने जाण्यापासून वाचवण्यासाठी काही निर्बंध लादले पाहिजेत.(Parenting Skills - Tips for Raising Teens)

मुलं मोठी होतात. तेव्हा पालकांनी मुलांना त्यांच्या इच्छेनुसार आयुष्य जगण्यासाठी काही स्वातंत्र्य देण्याची (Freedom) गरज असते. पालकत्वाच्या (Parenting) प्रवासाचा हा महत्वाचा तसेच आवश्यक टप्पा आहे. हा टप्पाच मुलांना (Kids) शिकविण्यास आणि वाढविण्यास मदत करतो. मुलांना तुम्ही पुरेसे स्वातंत्र्य दिले तर त्यांना तर त्यांना स्वतंत्र्य होण्यास आणि योग्य-अयोग्य यामधील फरक ओळखण्यास मदत होते. पण त्याचबरोबर मुलांवर तुम्ही पालक म्हणून कोणतेही चुकीचे निर्णय घेण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने जाण्यापासून वाचवण्यासाठी काही निर्बंध लादले पाहिजेत. त्यामुळे मुलांना नक्की किती स्वातंत्र्य द्यायचे हा प्रश्न निर्माण होतो. तसे तर मुलांना किती स्वातंत्र्य दावे याचे काहीच नियम नाहीत.(Parenting Skills - Tips for Raising Teens)

teenage

पडतात अनेक प्रश्न

योग्य प्रमाणात स्वातंत्र्य दिल्याने मुलांना पौगंडावस्थेसाठी तयार करण्यासाठी मदत मिळते. मुलांना किती स्वातंत्र्य द्यावे याबद्दल पालकांचा गोंधळ उडणे ही सामान्य गोष्ट असली तरी त्याचे उत्तर प्रत्येक व्यक्तीसाठी तुमच्या मुलाचे वय काय आहे, तो/ती किती प्रौढ आहे, त्यांना कौटुंबिक पाठिंबा किती आहे, त्यांचे पूर्वीचे अनुभव काय आहेत, दिलेल्या परिस्थितीत ते किती जबाबदारीने वागतात? बर्‍याच वेळा मुले लोकांना चांगली ओळखू शकतात किंवा भूतकाळातील गोष्टींमुळे काही विशिष्ट परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकत नाहीत, अशा वेळी त्यांना पालकांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते.

teenager

या गोष्टी लक्षात ठेवा

वयाचा विचार करा(Consider the age) - मुलाला त्याच्या वयानुसार योग्य त्या गोष्टींनाच परवानगी द्या. मुलगा-मुलगी फक्त 16 वर्षाची असेल तर त्यांना रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहू देऊ नका. परवान्याशिवाय कार चालवू नका. त्यांना विशिष्ट गोष्टींचा लाभ घेण्यासाठी वयाी १८ वर्षे पूर्ण होण्याची वाट पाहण्यास सांगा.

स्पष्ट मर्यादा आखा (Set clear limits) : मुले तुमच्याकडे विशिष्ट गोष्टी करण्यासाठी परवानगी मागतात. त्यामुळे त्यांना तुमचे नियम आणि जबाबदारीचे रूप स्पष्ट सांगा . त्यामुळे ते अधिक जबाबदारीने वागू शकतील. जेव्हा ते बाहेर जातील तेव्हा परत येण्यासाठी वेळ ठरवून द्या. मित्रांसोबत जो वेळ घालवणार आहेत, त्यावर मर्यादा घाला. तसेच, अभ्यासाचा वेळ किती असावा याबाबतही नियम ठेवा.

children

नियम तोडण्याचे परिणाम दाखवा(Implement consequences for breaking rules) - जेव्हा तुमचे मुल तुम्ही घालून दिलेले नियम किंवा मर्यादा मोडते तेव्हा तुम्ही त्याला शिक्षा किंवा ओरडा द्या. जर तुम्ही योग्यवेळी कृती केली नाही, तर ते वारंवार चुकतील. अशावेळी मुलांना कठोर शिक्षा करण्याची वेळ आल्यास ती करा. यामुळे मुलांना शिस्तीचे महत्व समजेल.

अधिक जबाबदारी घेण्याचे स्वातंत्र्य द्या (Link their freedom with responsibilities) - तुमच्या मुलांना अधिक जबाबदार बनवायचे असेल, त्यांना अधिक जबाबदारी घेण्याचे स्वातंत्र्य द्या. त्यांना घरची कामे करायला द्या, बिले भरायला द्या. किराणा सामान आणायला पाठवा. असे केल्याने त्यांना अधिक जबाबदारी येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs SA : नुसता धुरळा... Phil Salt चे वेगवान T20I शतक अन् जॉस बटलरच्या १५ चेंडूंत ७४ धावा; इंग्लंडचा रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर, मोडला भारताचा विश्वविक्रम

Elphinstone Bridge : मुंबईतील एलफिस्टन पुलावर अखेर हातोडा

Pune ZP : राज्यामध्ये ३४ ठिकाणी अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; पुणे ‘झेडपी’साठी खुला प्रवर्ग, सतरा ठिकाणी महिलांसाठी आरक्षण

Karnataka accident during Ganesh Visarjan: कर्नाटकात भीषण दुर्घटना! गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव ट्रक घुसला; आठ जणांचा मृत्यू

Rafale fighter jets India: आता शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या 'राफेल' लढाऊ विमानांची भारतात निर्मिती होणार!

SCROLL FOR NEXT