Red Potato: Sakal
लाइफस्टाइल

Red Potato: लाल बटाटा आरोग्यासाठी बहूगुणी, जाणून घ्या फायदे

Red Potato: लाल बटाट्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे आरोग्यदायी असते.

Puja Bonkile

Red Potato Health Benefits: बटाट्याचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. बटाट्यापासून भाजी,चिप्स,पकोडे, पराठा, यासारखे अनेक पदार्थ बनवले जातात. खरं तर प्रत्येक घरातील ही एक सामान्य भाजी आहे. अनेक लोकांना बटाट्याची भाडी आवडते. बटाट म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पांढरा बटाटा येतो. परंतु तुम्हाला माहितीय का बटाटा लाल रंगाचा देखील असतो. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. खास म्हणजे अँथोसायनिनमुळे त्याचा रंग लाल होतो. लाल बटाटे खाण्याचे कोणते आरोग्यदायी फायदे आहेत हे जाणून घेऊया.

पोषक घटक

लाल बटाट्यामध्ये फायबर , पोटॅशियम, व्हिटॅमिन सी यासारखे अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. हे घटक शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

हृदयाचे आरोग्य

लाल बटाट्यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास मदत करते. यामुळे उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यांसारख्या समस्यांचा धोका कमी होतो .

पचनसंस्था

लाल बटाट्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे पचन संस्था सुरळितपणे कार्य करते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होते.

मानसिक आरोग्य

लाल बटाट्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी मानसिक आजार दूर ठेवतो. यामुळे स्मरणशक्ती वाढते.

प्रतिकारशक्ती

लाल बटाट्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी शरीराची रोग-प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये असलेले पोषक घटक शरीराला संसर्गापासून दूर ठेवतात.

एनर्जी मिळते

कार्बोहायड्रेट्सने समृद्ध असलेला लाल बटाट्याचे सेवन केल्याने एनर्जी मिळते. यामुळे दिवसभर थकवा जाणवत नाही.

त्वचा

लाल बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्वचा निरोगी राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT