Refrigerator Sound
Refrigerator Sound esakal
लाइफस्टाइल

Refrigerator Sound : फ्रिजच्या आवाजानं डोकं उठलंय? शेअर कराव्यात अशा सोप्या टिप्स पहाच!

सकाळ डिजिटल टीम

Refrigerator Sound : घरात लाईटचा काही इशू असेल. किंवा व्होल्टेज बरोबर नसताना अनेक वेळा रेफ्रिजरेटरचा कंप्रेसर चालू होत नाही. या कारणामुळे फ्रिजचा प्रचंड आवाज येतो. याशिवाय फ्रीज लूज कनेक्शनमुळेही आवाज करू लागतो.

जर तुमच्या फ्रीजमध्येही आवाज येत असेल तर आज आम्ही तुम्हाला या समस्येचा कसा सामना करू शकतो हे सांगणार आहोत.

रेफ्रिजरेटर सर्व घरांमध्ये वापरले जाते. शहरात तर प्रत्येक घरातील किचनमध्ये देवघर नसेल पण फ्रिजसाठी जागा मात्र असते. जवळपास सर्वच लोकांनी फ्रीज पाहिला असेल. फ्रीज आपल्या खाद्यपदार्थांना बॅक्टेरियापासून दीर्घकाळ सुरक्षित ठेवतो.

पण, इलेक्ट्रिक उत्पादनांप्रमाणे यामध्येही अनेक प्रकारचे दोष आहेत. त्यामुळे अनेक वेळा फ्रीजमधून आवाज येऊ लागतो. हा आवाज दर एक-दोन मिनिटांनी येतो. तर यासाठी काय उपाय करता येतील हे पाहुयात.

घरातल्या कुकरचा, भाजीच्या फोडणीचा वास यामुळे आधीच गृहिणींचे डोकं उठलेलं असतं. आणि त्यात भर म्हणजे हा आवाज करणारा फ्रिज होय. फ्रीजच्या आवाजाची समस्या सोडवण्यापूर्वी तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की हा आवाज फ्रीजमधून का येतो?

फ्रीज हे इलेक्ट्रिक उपकरण आहे. त्यामूळे व्होल्टेज योग्य नसतील तर रेफ्रिजरेटरचा कंप्रेसर सुरू होत नाही. यामुळेच त्याच्या आवाज येतो. याशिवाय लोड शेडींग होत असल्याने ही समस्या उद्भवते.

इतकेच नाही तर कधी कधी रेफ्रिजरेटरचे कनेक्शन लूज असेल तरी आवाज येत असतो. बऱ्याच वेळा रेफ्रिजरेटरचा ओव्हरलोड संरक्षक खराब झाला आहे, ही समस्या रेफ्रिजरेटरमध्ये देखील उद्भवू शकते.

चुकीची गॅस टाकी, फ्रीजची कंडेन्सर कॉइल, कॉम्प्रेसरची चुकीची फिटिंग आणि कूलिंग कॉइलमध्ये जास्त प्रमाणात बर्फ जमा झाल्यामुळेही रेफ्रिजरेटर आवाज करू लागतो.

पुरेशी देखभाल आणि नियमित तपासणी करून तुम्ही फ्रीजला आवाजाच्या समस्येपासून दूर ठेवू शकता. हा दोष तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये येऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर त्याची नियमित सर्व्हिसिंग करत रहा.

जर तुमचा फ्रीज आवाज करत असेल तर आता तुम्ही काही युक्त्या वापरून हा आवाज कमी करू शकता.

अनेक वेळा फ्रीज आणल्यानंतर लोक साफ करत नाहीत, त्यामुळे त्याचा आवाज येऊ लागतो. अशा परिस्थितीत, तुमचा रेफ्रिजरेटर आवाज करत नाही असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्याचे हलणारे भाग नियमितपणे स्वच्छ करत राहणे महत्त्वाचे आहे.

अनेकदा लोक फ्रीज जमिनीला टेकवून ठेवतात. त्यामुळे तो आवाज करू लागतो. म्हणूनच रबर चटई वापरून तुमचा फ्रीज तुमच्या मजल्यापासून वेगळे करणे महत्त्वाचे आहे.

जर तुमचा फ्रीज आवाज करत असेल तर तुम्ही तुमच्या फ्रीजभोवती साउंडप्रूफ रूम डिव्हायडर वापरू शकता. याच्या मदतीने तुम्हाला फ्रीजचा आवाज कमी ऐकू येईल.

याशिवाय जर तुम्हाला फ्रीजमधून जास्त आवाज येत असेल तर तुम्ही तुमच्यासाठी बनवलेले साउंडप्रूफ कॅबिनेट घेऊ शकता. फ्रीजचा आवाज कमी करण्यासाठी साउंडप्रूफ कॅबिनेट खूप प्रभावी ठरू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi : विधानसभेसाठीही एकजूट; ‘मविआ’चा निर्धार

India Aghadi : राहुल गांधींवर ‘इंडिया’चा दबाव

Heavy Rain : पावसामुळे सिक्कीममध्ये हाहाकार! रस्ते खचले, नऊ जणांचा मृत्यू,‘तिस्ता’ची पातळी वाढली

Sasoon Hospital : मेफेड्रोन प्रकरणाचा तपास ‘एनसीबी’कडे; मुख्य सूत्रधार संदीप धुनिया मात्र अद्याप फरार

Mahayuti Leaders : महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध; आमदारांची नाराजी दूर करण्याचा शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT