sexual relationship  Team e Sakal
लाइफस्टाइल

लंबूजीपेक्षा बुटका नवराचं भारी; लैंगिक विषयक अभ्यासकांचा दावा

न्यूयॉर्क विद्यापीठातील संशोधकांनी 531 पुरुषांवर हा अभ्यास केला आहे.

सकाऴ वृत्तसेवा

बहुतेक स्त्रियांना (Women) उंच पुरुष (Tall Men)आवडतात पण कमी उंचीच्या पुरुषांचीही स्वतःची योग्यता असते. 'द जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसीन' मधील नवीन अभ्यासात कमी उंचीच्या पुरुषांशी संबंधित अनेक रंजक गोष्टी समोर आल्या आहेत. अभ्यासात असे आढळून आले आहे की, कमी उंची असलेले पुरुष अधिक लैंगिकदृष्ट्या सक्रिय (Sexually Active) असतात. न्यूयॉर्क विद्यापीठातील संशोधकांनी 531 पुरुषांवर हा अभ्यास केला आहे.

काय आहेत अभ्यासातील निष्कर्ष

अभ्यासात असे आढळून आले आहे की, ज्या पुरुषांची उंची 175 सेमी पेक्षा कमी होती, म्हणजेच ज्यांची उंची 5'9 पेक्षा कमी होती, त्यांची Sex drive चांगली होती. कमी उंचीचे पुरुष (Men of short stature) केवळ लैंगिकदृष्ट्या सक्रिय (Sexually Active) नसतात, परंतु त्यांच्या जोडीदाराशी घटस्फोट (Divorce) घेण्याची शक्यता 32 टक्के कमी असते. संशोधकांचे म्हणणे आहे की, कमी उंचीचे पुरुष घरातील जास्त कामे करतात आणि उंच पुरुषांपेक्षा जास्त पैसे कमावतात. एकूणच, या अभ्यासानुसार, पुरुषाची उंची जितकी कमी असेल तितका तो चांगला जोडीदार असल्याचे सिद्ध होत आहे.

हे आहे कारण -

संशोधकांना यामागचं नेमकं कारण स्पष्ट करता आलेलं नाही, परंतु त्यांना वाटते की उंच पुरुष (Tall Men) त्यांच्या दिसण्याबद्दल अधिक विश्वास ठेवतात. दुसरीकडे, कमी उंची असलेले पुरुष स्वतःला सिद्ध करण्यात गुंतलेले असतात आणि यामुळेच ते घरी आणि ऑफिसमध्ये जास्त परिश्रम करतात. स्त्रियांना कमी उंचीचे पुरुष आवडत नाहीत असे नाही. अशी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल्स आहेत जिथे पुरुष कमी उंचीचे असतात आणि स्त्रिया (Women)उंच असतात. वरवर पाहता उंच (Tall), डार्क (Dark)आणि हॅन्डसम (Handsome) ही चर्चा आता कालबाह्य झाली आहे आणि या अभ्यासानंतर कमी उंचीच्या पुरुषांना पंसती मिळण्याची शक्यता निश्चितच वाढू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : इचलकरंजीच्या तरूणाचे अपहरण करून निर्घृण खून; कर्नाटक -महाराष्ट्र सीमेवरील ओढ्यात फेकला मृतदेह, खुनाचं कारण काय?

Latest Marathi News Live Update : शरद पवार लवकरच बाबा आढाव यांची भेट घेणार!

जगभरात धुमाकूळ घालणारी रशियन दारू का आहे फेव्हरेट? किंमत ऐकून बसेल धक्का...

Kolhapur TET Oppose : टीईटी सक्तीविरोधात शिक्षकांचा प्रचंड आक्रोश; शाळा बंद ठेवत हजारोंचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निमिष कुलकर्णी अडकला लग्नबंधनात; थाटात पार पडला विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT