लाइफस्टाइल

काय?? चक्क ज्वालारसावर तयार केला स्वयंपाक; Video viral 

शर्वरी जोशी

जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही काय करता? एक तर घरी स्वयंपाक करुन जेवता किंवा अगदीच कंटाळा आला असेल तर एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन  वा पार्सल काही तरी पदार्थ मागवता. बरोबर? पण भूक लागली आहे म्हणून कधी ज्वालामुखीच्या तप्त ज्वालारसावर स्वयंपाक केल्याचं कधी ऐकलं आहे का?अर्थात याचं उत्तर नाही असंच असेल. परंतु, आइसलँडमध्ये काही वैज्ञानिकांनी हे धाडस करुन दाखवलं आहे. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

ज्वालामुखी म्हटलं की त्यातील सतत उसळणारा तप्त ज्वालारस डोळ्यासमोर येतो. सतत खवळणाऱ्या या ज्वालामुखीचा कधी उद्रेक होईल आणि कधी तो फुटेल याचा काही नेम नसतो. त्यामुळे ज्वालामुखी असलेल्या ठिकाणी राहण्याची किंवा त्याच्या जवळ फिरकण्याही कोणाची बिशाद नसते. परंतु,  आइसलँडच्या रेकेविकमधील एका ज्वालामुखीच्या तप्त ज्वालारसावर काही वैज्ञानिकांनी हॉटडॉग्स,बन,सॉसेज गरम करुन ते खाल्ले आहेत.

रेकेविकमधील  जवळपास ८०० वर्षांनी सर्वात मोठा ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून येथे काही वैज्ञानिक संशोधन करत आहेत. विशेष म्हणजे ही तपासमोहिम सुरु असतांना या वैज्ञानिकांना भूक लागली. मात्र, या ज्वालामुखी जवळ कोणतंही गाव किंवा नागरी वस्ती नसल्यामुळे त्यांना ज्वालारसावरच त्यांचं जेवण तयार करुन घ्यावं लागलं.

भूक लागल्यामुळे या वैज्ञानिकांनी त्यांच्या बॅगेमधून सॉसेज, बन, हॉटडॉग्स आणि टोमॅटो काढून ते ज्वालारसावर ग्रील केले.  खरंतर हा त्यांच्या संशोधनाचा भाग नव्हता.मात्र, भूकेमुळे त्यांनी हा प्रयोग करुन पाहिला. विशेष म्हणजे ज्वालारसावर तयार करण्यात आलेल्या पदार्थांची चव कशी असते हेदेखील त्यांनी सांगितलं. त्यानुसार, ज्वालारसावर हे पदार्थ ग्रील केल्यामुळे त्याला ज्वालारसाच्या राखेचा वास येत होता. त्यामुळे हे पदार्थ नीट शिजले जरी असले तरी ते खाण्या योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.

ज्वालारस किती गरम असतो माहितीये?

साधारणपणे ज्वालारस हा ७०० ते १२५० डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम असतो. त्याच्यातील उष्णतेमुळे धातू सारख्या वस्तूदेखील सहज वितळून जातात. सध्या आइसलँडमधील किलिर पर्वतावरील ज्वालामुखीचा स्फोट झाला आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT