Shardiya Navratri 2024: Sakal
लाइफस्टाइल

Shardiya Navratri 2024: मधुमेहींनी उपवास करताना 'या' गोष्टींची घ्यावी मदत, शुगर राहील कंट्रोल

Shardiya Navratri 2024: जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि नवरात्रीचा उपवास करत असाल तर तर या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची खास काळजी घेतली पाहिजे.

Puja Bonkile

Shardiya Navratri Sugar Diet: 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरू झाला आहे. नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. सर्वत्र भक्तीमय आणि मंगलमय वातावरण पाहायाला मिळत आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी उपवास देखील करतात. नवरात्रीमध्ये मातेवर श्रद्धा असली तरी उपवासासह आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे आहे. तुम्हाला मधुमेह असेल आणि उपवास करत असाल तर पुढील गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

उपवास केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघून जातात. जर तुम्हाला मधुमेह असेल आणि नवरात्रीचे उपवास करत असाल तर तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्या.  

हृदया संबंधित समस्या

तुम्हाला मधुमेह असेल तर नवरात्रीचे उपवास करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उपवासामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने घसरण्याची भीती असते. मधुमेहींना किडनी, यकृत, उच्च रक्तदाब तसेच हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका असू शकतो. नवरात्रीच्या उपवासात राजगीरा पीठापासून बनवलेले पदार्थ बनवून खाऊ शकता. तसेच उपवास करत असाल तर डॉक्टरांकडून आहार लिहून घेऊ शकता.  

डिहायड्रेशन

मधुमेही लोकांनी नवरात्रीत उपवास करताना भरपूर पाणी आणि फळांचा रस प्यावा. कारण अशा लोकांना डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. तुम्ही ताक, लिंबू पाणी आणि नारळ पाणी पिऊ शकता. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. उपवासा दरम्यान दही खाणे आरोग्यदायी मानले जाते. तसेच दिवसभर उत्साही राहाल.

शुगर फ्रि पेय

मधुमेह असणाऱ्या लोकांनी शुगर फ्री पेयांचे सेवन करावे. गोड पेय रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. तसेच ज्या पदार्थांमध्ये चरबी, सोडियम आणि कर्बोदकांमध्ये जास्त प्रमाणात असातात असे पदार्थ खाणे टाळावे. तसेच उपवासा दरम्यान काही त्रास होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

आज संपतोय Amazon Summer Sale, फक्त 99 रुपयांपासून मिळतायत वस्तू..सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

"आम्ही एकत्र सिनेमा बघायला जाणार होतो त्यापूर्वीच" राजा शिवाजी फेम अभिनेत्रीला पितृशोक; म्हणाली..

SCROLL FOR NEXT