Gym Etiquette
Gym Etiquette esakal
लाइफस्टाइल

Shark Tank : शार्क टॅंक फेम अनुपम मित्तल Heavy Workout मुळे अॅडमिट... आधीच घ्या या ९ गोष्टींची काळजी

सकाळ डिजिटल टीम

Gym Etiquette : शार्क टॅंक इंडियाचे एक जज आणि Shaadi.com चे मालक अनुपम मित्तल एक फिटनेस फ्रीक आहे, पण कठोर वर्कआउट्समुळे त्यांची नुकतीच शस्त्रक्रिया झाली आणि त्यांचा हात आता सपोर्ट बँडमध्ये गुंडाळला गेला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलच्या बेडवरचा त्यांच्या एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत शेअर केले.

पोस्ट पाहून, त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि तो पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याला काळजी घेण्यास सांगितले आहे. अनुपम यांच्या वर्कआउट्समुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, असं एकदा घडलं होतं. ही काही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाही... अशी दुखापत होऊ नये म्हणून कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते हे बघूया...

१. योग्य वॉर्म-अपसाठी वेळ काढा

तुमच्या रनिंगच्या किंवा एरोबिक्सच्या वर्कआउटला थेट सुरुवात करणे खूप धोक्याचे आहे, आपले कोल्ड स्नायू कमी लवचिक असतात शिवाय याने आपल्याला फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. तुमच्या वर्कआउटच्या आधी ५ ते १० मिनिटे वॉर्म-अप करा. जर तुम्हाला कुठे काही दुखापत झाली असेल तर तिथल्या स्नायूंना कमीतकमी त्रास होईल असा वर्कआउट करा.

२. आपल्या क्षमतांचा अतिरेक करू नका

आपली क्षमता तपासणे ठिक आहे पण उगाच स्वतःला नको ते आव्हाहन देणे चुकीचे आहे. शिवाय एकेकाळी तुम्ही खूप हेवी वर्कआउट करु शकत होतात म्हणजे आजही ते जमेलच असं नाही. आपली योग्य क्षमता ओळखूनच वर्कआउट करा.

३. क्रॉस-ट्रेन

अनेकदा आपले व्यायाम काळानुसार बदलले जाते, पण यात तज्ञांची मदत घ्या, आपल्याला वाटलं म्हणून आपले वर्कआउट बदलू नका, हा आगाऊपणा तुमच्या जीवावर बेतू शकतो. अनेकदा लोकं एकावेळेनंतर अजून जास्त वजनाचे डंबेल्स वापरण्याचा अट्टहास करता आणि हेच धोक्याच आहे, आपण यासाठी तयार आहोत का याचं आधी नीट परीक्षण करा.

४. योग्य तंत्र शिका

जर तुम्ही नवीन वर्कआउट पथ्ये सुरु करत असाल तर, योग्य फॉर्म शिकण्याची गरज आहे. प्रत्येका व्यायामाच्या प्रकारची एक पद्धत असते, आपल्या मनाने व्यायाम करु नका, त्याने तुम्हालाच त्रास होईल. अशाने विशेषत: वेटलिफ्टिंगमध्ये, गंभीर दुखापत होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला तुमचे प्रशिक्षण थांबवावे लागेल.

५. संतुलित आहार घ्या

योग्य आहार, आणि प्रशिक्षणादरम्यान योग्य वेळेत खाणे, हे तुमच्या आरोग्यासाठी आणि व्यायामाच्या कामगिरीसाठी फार महत्त्वाचे आहे. प्रशिक्षणाच्या दोन तास आधी हलके, संतुलित जेवण किंवा स्नॅक खाल्ल्याने तुमच्या कार्यक्षमतेला चालना मिळण्यास मदत होईल, शिवाय वर्कआउटच्या काही वेळानंतर नाश्ता किंवा जेवण करा.

६. भरपूर पाणी प्या

अन्नाप्रमाणेच, डिहायड्रेटेड असतांना व्यायाम केल्याने दुखापत होऊ शकते. तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुम्हाला घाम येतो, तुमच्या शरीरातून केवळ पाणीच नाही तर मेंदू आणि शरीराच्या कार्यासाठी महत्त्वाचे असलेले इलेक्ट्रोलाइट्स देखील बाहेर पडतात. फक्त, पुरेसे पाणी न पिणं ही वाईट गोष्ट आहे, तशीच जास्त प्रमाणात पिणे देखील वाईट, कारण व्यायामादरम्यान तुम्हाला मळमळ आणि इतर त्रास देऊ शकते.

७. व्यायामासाठीचेच कपडे वापरा

जेव्हा आपण वर्कआउट किंवा गेम्स खेळतो तेव्हा स्ट्रेचेबल कपडे वापरणे गरजेचे आहे, शिवाय ते कपडे आणि शूज हे आपल्याला कम्फर्टेबल हवेत. यासाठी स्पोर्ट्स वेअर म्हणून कपड्यांचा एक वेगळा प्रकार सुद्धा बाजारात उपलब्ध आहे.

८. आपल्या शरीराचे ऐका

काही दुखत असेल तर थांबा. त्रास होतो आहे दिवसेंदिवस वाढतो आहे तरीही वर्कआउट सुरु ठेवला आहे असं नको, आपलं शरीर आज आपल्याला व्यायाम करायचं आहे की नाही हे सांगत असतं ते समजून घ्या. विश्रांती घ्या, दुखापतीचा धोका पत्करण्यापेक्षा तुम्ही वेदनादायक हालचालींपासून मागे हटणे कधीही चांगले.

९. विश्रांतीचे दिवस वगळू नका

असं म्हणतात आठवड्यातून ३ ते ५ दिवस वर्कआउट करणं कधीही चांगलं, रोज वर्कआउट करणं वाईट नाही पण जर आपल्या शरीराला हे झेपेलच असं नाही त्यामुळे ब्रेक घ्या. शिवाय वर्कआउट करतांनाही जरा ब्रेक घ्या, मधून मधून थोडं थांबण ठिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

SCROLL FOR NEXT