Shravan Special: Sakal
लाइफस्टाइल

Shravan Special: श्रावणात चुकूनही 'या' गोष्टी घरात ठेऊ नका , वाढेल नकारात्मकता

Shravan Special: श्रावण महिना भगवान शंकराला प्रिय आहे. या दिवसात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा करतात आणि उपवास करतात. तसेच या महिन्यात काही गोष्टी घरात ठेवणे टाळावे.

Puja Bonkile

Shravan Special: श्रावण महिना ५ ऑगस्टपासून सुरू झाला आहे. श्रावण महिना महादेवाचा आवडता असून महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवभक्त मनोभावे पूजा करतात आणि उपवास करतात. तसेच महादेवाची पूज करताना बेलाचे पान, पांढरे फूल अर्पण करणे शुभ मानले जाते. वास्तूनुसार श्रावणात कोणत्या गोष्टी घरात ठेऊ नये हे जाणून घेऊया.

मांस, अंडी यासारखे पदार्थ

श्रावणात सात्विक पदार्थांचे सेवन करणे शुभ मानले जाते. तसेच पावसाळ्यात मासंहार करणे आरोग्यासाठी चांगले नसते. मासांहार केल्यास पोटासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. महादेवाची पूजा करताना मन शुद्ध आणि स्वच्छ असावे तरच भोलेनाथ प्रसन्न होतात. यामुळे श्रावणात मांस, अंडी कांदा, लसूण यासारखे पदार्थ घरात ठेऊ नका.

तुटलेल्या मुर्ती

श्रावण महिन्यात घरात तुटलेल्या मुर्ती ठेऊ नका. यामुळे घरात नकारत्मकता वाढते. तुटलेल्या मुर्ती नदी किंवा तलावात विसर्जीत कराव्या. यामुळे घरात सकारात्मक वातावरण कायम राहते.

बंद घड्याळ

तुमच्या घरात बंद घड्याळ असेल तर लगेच काढून टाका. कारण वास्तूनुसार अशा घड्याळ घरात ठेवणे अशुभ मानले जाते. तसेच घरात नकारात्मकता वाढते.

पुढील गोष्टी ठेवा लक्षात

हिंदु धर्मात तुळशीच्या रोपाला खुप महत्व आहे. पण महादेवाची पूजा करताना तुळशीचे पान वापरणे अशुभ मानले जाते. तसेच केतकीचे फुल देखील अर्पण करू नका. महादेवाला शमीचे पान अर्पण करावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT