लाइफस्टाइल

Paneer Side Effects :पनीर खाण्याचे फायदे तर खूप, पण त्याचे दुष्परिणाम माहितीयेत का? जाणून घ्या

पनीर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, पण त्याचे जास्त सेवन केल्यानेही समस्या निर्माण होऊ शकतात.

Aishwarya Musale

जे नॉनव्हेज खात नाहीत, ते पनीरचे भरपूर सेवन करतात. यामध्ये भरपूर प्रथिने आढळतात. व्हेजिटेरियन डाएट फॉलो करणाऱ्या लोकांना पनीर खायला आवडते. हे प्रथिने आणि कॅल्शियमचे चांगले स्त्रोत मानले जातात. त्यामुळेच पनीरचा आहारात समावेश केल्यास सांधेदुखी कमी होण्यास आणि हाडे निरोगी राहण्यास मदत होते.

मात्र, जेव्हा तुम्ही दररोज आवश्यकतेपेक्षा जास्त पनीर खाण्यास सुरुवात करता तेव्हा त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तर, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जास्त पनीर तुमच्यासाठी किती हानिकारक असू शकते.

पचनाशी संबंधित समस्या

पनीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुमच्या पोटात सूज येऊ शकते. यामुळे छातीत जळजळ आणि ओटीपोटात तीव्र वेदना होणे, असा त्रास होऊ शकतो. पनीरमध्ये भरपूर प्रोटीन असल्यामुळे ते पचायला वेळ लागतो, जर तुम्ही ते जास्त खाल्ले तर पोट फुगणे किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

किडनी स्टोन होण्याची शक्यता

जर पनीर जास्त प्रमाणात खाल्लं तर त्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता खूप जास्त वाढते. पनीरमध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे असे घडते. जरी कॅल्शियम हाडांसाठी खूप महत्वाचे आहे. पण जर ते जास्त प्रमाणात खाल्ले तर किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. त्यामुळे, नेहमी पनीरचे सेवन मर्यादित प्रमाणात करण्याचा सल्ला दिला जातो.

वजन वाढण्याची समस्या

जर तुम्ही वजन कमी करत असाल तर जास्त प्रमाणात पनीर खाणे चांगले मानले जात नाही. पनीरमध्ये कॅलरी आणि चरबीचे प्रमाण जास्त असते. जेव्हा तुम्ही योग्य शारीरिक हालचाली करत नाही आणि जास्त प्रमाणात पनीरचे सेवन करता, तेव्हा तुमचे वजन वाढू लागते. आम्ही तुम्हाला सांगतो की 100 ग्रॅम पनीरमध्ये अंदाजे 265 कॅलरीज असतात.

हाय ब्लड प्रेशरची समस्या

जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर पनीरचे जास्त सेवन करू नका, कारण त्याच्या सेवनामुळे तुमची बीपीची समस्या अधिक वाढू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT