लाइफस्टाइल

Beetroot Face Mask : गालांवर गुलाबी चमक मिळवण्यासाठी बीटचा हा फेसमास्क नक्की ट्राय करा! जाणून घ्या कसा तयार करायचा?

चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यासाठी बीटचा हा फेसमास्क नक्की ट्राय करा!

Aishwarya Musale

बीटरूट आरोग्यासाठी खूप चांगले आहे, म्हणूनच डॉक्टर देखील ते खाण्याचा सल्ला देतात. पण ते त्वचेसाठीही खूप चांगले आहे. कारण ते तुमच्या त्वचेला गुलाबी चमक आणते. यामध्ये अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे सुरकुत्या, स्किन अ‍ॅलर्जी आणि त्वचेवर बारीक रेषा यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. तुम्ही घरच्या घरी बीटचा फेसमास्क तयार करू शकता.

बीटरूटचे फायदे

बीटरूट खूप फायदेशीर आहे कारण त्यात लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे पोषक घटक असतात. यासोबतच बीटरूटमध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-एजिंग आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात, जे त्वचेसाठी खूप चांगले असतात. त्यामुळे तुम्ही ते त्वचेवर नक्की ट्राय करा. हा एक नैसर्गिक घरगुती उपाय आहे.

बीटरूट फेस मास्क बनवण्यासाठी साहित्य

  • बीटरूट- 1

  • बडीशेप पाणी - 3 चमचे

  • ग्लिसरीन - 1 टीस्पून

बीटरूट फेस मास्क कसा बनवायचा

  • हे करण्यासाठी तुम्हाला बीटरूट घेऊन त्याची साल काढावी लागेल.

  • यानंतर, ते पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा.

  • नंतर त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

  • आता ते गाळून पाणी वेगळ्या भांड्यात ठेवा.

  • यानंतर, एक पॅन घ्या आणि त्यात बडीशेप उकळवा.

  • थंड झाल्यावर मिक्स करा.

  • यामध्ये ग्लिसरीन घालावे लागेल.

  • हे मिश्रण चांगले मिसळा.

  • आता ते चेहऱ्यावर लावा आणि 30 मिनिटे राहू द्या.

  • यानंतर चेहरा टॉवेलने स्वच्छ करा.

  • यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि गुलाबी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake RTO Website: अवघ्या सात रुपयांमध्ये डुप्लिकेट आरसी बुक! आरटीओच्या बनावट वेबसाइट प्रकरणातील धक्कादायक प्रकार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण’ योजना बंद नाही; काहींना लखपती करणार : मुख्यमंत्री फडणवीस

Supreme Court : मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून संपत्तीत हिस्सा देण्यास नकार, सुप्रीम कोर्टानेही वडिलांची दिली साथ; नेमकं काय घडलं?

Shocking : विमान कोसळले! दिग्गज खेळाडूसह कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू, पाच वर्षांचा मुलगा अन् १४ वर्षांची मुलगी आगीच्या तांडवात सापडले

...तर मराठा समाज राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करेल: राज्य समन्वयक महेश डोंगरे; धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरून ‘मराठा क्रांती’चा इशारा

SCROLL FOR NEXT